पुणे : पुण्याचे भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात कोर्टाने ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. मोहोळ यांना सार्वजनिक स्वच्छतागृहाचं प्रकरण महागात पडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शौचालय ठेकेदार असलेल्या भाचाच्या मदतीने तोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. कोथरूडमधील भीमनगर भागातील नागरिकांनी ही जागा सोडून जावे यासाठी महापौरांनी हे शौचालय तोडलं आहे.
मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या पत्नी जवळपास 20 वर्षांपासून नगरसेवक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या वार्डमधील हा प्रकार आहे. भीमनगरच्या नागरिकांना त्या ठिकाणाहून स्थलांतर करायला लावून, त्या ठिकाणी एखादा गृहप्रकल्प सुरू करण्याचा मोहोळ यांचा प्लॅन असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पळून गेलेल्या गुन्हेगाराला सुप्रीम कोर्ट अटकेपासून वारंवार संरक्षण का देताय? खासदार अरविंद सावंत
त्यामुळे या नागरिकांनी या प्रकरणात कोर्टामध्ये धाव घेत याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने मोहोळ यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. तर या प्रकरणात अनेक तांत्रिक बाबी अंतर्भूत आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू करावा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच यासंदर्भात एका महिन्यात तपासाचे निष्कर्ष समोर आणणार असेही त्यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- मोठी बातमी : एसटीच्या १० हजार कर्मचाऱ्यांवर आज निलंबनाची कारवाई
- कोस्टल रोडचा भ्रष्टाचार काढला म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल केला – आशिष शेलार
- शशिकांत शिंदे तुम्हाला थंड करुन घरात बसवायची आमच्यात ताकद – शिवेंद्रराजेंनी भरला दम
- शिवसेनेने छाटले रामदास कदमांचे पंख; दापोली विधानसभा क्षेत्रात माजी आमदार सूर्यकांत दळवी पुन्हा सक्रिय
- एक सोपा आणि साधा संकल्प पूर्ण करणार का? पंकजा मुंडेंचे भावनिक पत्र व्हायरल