पुणे : स्वातंत्र्य लढून, संघर्षातून, आत्मबलिदानातून मिळाले हा इतिहास आहे. त्यामुळे भीक म्हणून काही कुणाला मिळाले असेल तर त्या पदव्या आणि पुरस्कार असतील, असा टोला कॉंग्रेसचा युवा नेता कन्हैयाकुमार यांनी आज अभिनेत्री कंगना रानावत यांना लगावला. पुण्यात पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात कन्हैयाकुमार बोलत होते.
कोस्टल रोडचा भ्रष्टाचार काढला म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल केला – आशिष शेलार
कन्हैयाकुमार म्हणाले, या देशाची खरी संस्कृती कॉंग्रेस आहे. कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो समाजतील सर्व वर्गांना एकित्रित आणून त्यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण करू शकतो.त्यामुळे कॉंग्रेसवरसध्या टीका होत असली तरी हाच पक्ष देशातल्या सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे. या पक्षाचे मूळ देशातील सर्वसामान्यांशी जोडलेली आहेत. टीका करणे प्रत्येकाचा आधिकार आहे. लोकशाहीने हा आधिकार प्रत्येकाला दिलाय. मात्र, देशात कॉंग्रेस, सिनेमा व क्रिकेट या तीन गोष्टीवर सर्वाधिक आणि सर्वत्र चर्चा केली जाते. याचे कारण या तीन गोष्टी सर्वसामान्यांशी जोडल्या गेल्या आहेत, असे कन्हैयाकुमार सांगितले.
मोठी बातमी : एसटीच्या १० हजार कर्मचाऱ्यांवर आज निलंबनाची कारवाई
देशातील जनतेच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करण्याची गरज असताना प्रत्येक गोष्टीवर राजकारण केले जाते. केवळ मूळ विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी कंगनासारख्या लोकांना बोलण्यास सांगण्यात येते. मात्र, विचारी लोकांनी अशा पद्धतीने बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायची गरज नसल्याचे कन्हैयाकुमार यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस कमकुवत झाली असा प्रचार केला जातोय. केंद्रातल्या सत्तेतले लोक यात आघाडीवर आहेत.वास्तविक भाजपालादेखील कॉंग्रेसकडूनच सर्वाधिक भीती वाटते. याचा अर्थ कॉंग्रेस पुन्हा उभी राहिली तर काय हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना सतावतोय. कॉंग्रेसवर कितीही टीका होत असली तरी कॉंग्रेस पक्ष हाच या मातीतला पक्ष आहे. देशाची संस्कृती, इतिहास व परंपरा या माध्यमातून कॉंग्रेसची निर्मिती झालीय. त्यामुळे कुणी कितीही टीका केली तरी कॉंग्रेस पूर्ण क्षमतेने उभी राहणार आहे, असही ते म्हणाले.
Read Also :
- भ्रष्टाचार, खंडणी, वसुली यापलिकडे महाविकास आघाडीचे कुठले कर्तृत्व नाही – चंद्रकांत पाटील
- शरद पवारांनी सांगितलं, 2024 ला सुद्धा ठाकरे सरकारचं येणार अन् मुख्यमंत्री…; जितेंद्र आव्हाड
- भाजपचा कुठलाही नेता, कोणत्याही महिलांबाबत अभद्र शब्द वापरू शकत नाही – देवेंद्र फडणवीस
- संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही जमिनीवर बसू; प्रविण दरेकरांचा आक्रमक पवित्रा
- पुण्यातील भाजपचे महापौर अडचणीत; मुरलीधर मोहोळ यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल