मुंबई : भाजपा आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधानासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता भाजपा आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकपणे बोलतात त्यामुळे त्यांना शांत करण्याचा प्रयत्न असल्याचं, म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. तर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
“भ्रष्टाचार, खंडणी, वसुली यापलिकडे महाविकास आघाडीचे कुठले कर्तृत्व नाही. आणि याविरुद्ध कुणी बोलले, तर त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविणे, यापलिकडे दुसरा उद्योग नाही. जनतेची सरकार म्हणून सेवा करणे, एवढे एक सोडून सारे काही सुरू आहे. संपूर्ण भाजपा आशिष शेलार यांच्या पाठीशी आहे!” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ट्विटद्वारे म्हणाले आहेत.
शशिकांत शिंदे तुम्हाला थंड करुन घरात बसवायची आमच्यात ताकद – शिवेंद्रराजेंनी भरला दम
तर, “एकीकडे संजय राऊत आक्षेपार्ह बोलत आहेत, तर दुसरीकडे मविआतील इतर नेते वाट्टेल ते बोलत आहेत. तुम्हांला एक न्याय व आमचे नेते जे काही बोलले नाही त्यासाठी त्यांना वेगळा न्याय! सरकारच्या विरोधात बोलणार्या विरोधी पक्ष नेत्यांवर अशाप्रकारे गुन्हे दाखल केले जातात. सूड भावनेने कारवाई करण्याचे काम केले जात आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.” असा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी आरोप केला आहे.
कोस्टल रोडचा भ्रष्टाचार काढला म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल केला – आशिष शेलार
तसेच, “तुम्हाला एक न्याय आणि आमचा नेता काही बोलला तर त्या वेगळा न्याय, असं चालणार नाही. हे सरकार विरोधी पक्षामधील जे कोणी सरकारच्या विरोधात बोलत आहे, त्यांच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल करत, सूड भावनेतून कारवाई करण्याचं काम सुरू आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. पोलीस जर अशाप्रकारे सरकारच्या दबावाखाली वागणार असतील आणि जर जनतेचा उद्रेक झाला तर त्याला सर्वस्वी महाविकासआघाडी सरकार जबाबदार असेल.” असा सूचक इशारा देखील दरेकरांनी माध्यमांशी बोलतान दिलेला आहे.
Read Also :
- शरद पवारांनी सांगितलं, 2024 ला सुद्धा ठाकरे सरकारचं येणार अन् मुख्यमंत्री…; जितेंद्र आव्हाड
- भाजपचा कुठलाही नेता, कोणत्याही महिलांबाबत अभद्र शब्द वापरू शकत नाही – देवेंद्र फडणवीस
- संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही जमिनीवर बसू; प्रविण दरेकरांचा आक्रमक पवित्रा
- पुण्यातील भाजपचे महापौर अडचणीत; मुरलीधर मोहोळ यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
- मोठी बातमी : एसटीच्या १० हजार कर्मचाऱ्यांवर आज निलंबनाची कारवाई