मुंबई : भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
प्रविण दरेकर म्हणाले की, जे सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना दाबायचे अशी परिस्थिती आहे. हा सूडबुद्धीचा कार्यक्रम सरकारचा आहे. भाजप कार्यकर्ता किती आक्रमक होतो हे दिसेल. संजय राऊत यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही जमिनीवर बसू” अशी भुमिका प्रविण दरेकरांनी घेतली आहे.
पळून गेलेल्या गुन्हेगाराला सुप्रीम कोर्ट अटकेपासून वारंवार संरक्षण का देताय? खासदार अरविंद सावंत
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वरळी सिलेंडर स्फोटप्रकरणात, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पेडणेकर यांनी काल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. याच प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात भादंवि कलम 354 अंतर्गत मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर आशिष शेलार यांनी माझा आवाज कधी बंद होऊ देणार नाही असं म्हणत आपल्यावर लागू केलेला गुन्हा खोटा आहे असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे, सांगितले आहे.
एक सोपा आणि साधा संकल्प पूर्ण करणार का? पंकजा मुंडेंचे भावनिक पत्र व्हायरल
संजय राऊत यांना पवारांसाठी खुर्ची घेऊन जात असल्याच्या प्रसंगावरून व्हायरल फोटोवरुन भाजपा नेत्यांची टीका सुरु आहे यासंबंधी विचारण्यात आले. यावेळी ते म्हणले की, “बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु आहेत, त्यांनींच मला हे संस्कार दिले आहेत. यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारणा चालत नाही सांगा त्यांना…ही चु**** बंद करा. अशाने राज्यात तुमचं राज्य कधीच येणार नाही. ही तुमच्या डोक्यातील विकृती, कचरा आहे. हा कचरा साफ केला नाहीत तर एखाद्या डंपिंग ग्राऊंडमध्ये लोक तुम्हाला गाढून टाकतील” हे मी तुम्हाला आत्ता सांगत आहे.
Read Also :
- पुण्यातील भाजपचे महापौर अडचणीत; मुरलीधर मोहोळ यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
- मोठी बातमी : एसटीच्या १० हजार कर्मचाऱ्यांवर आज निलंबनाची कारवाई
- कोस्टल रोडचा भ्रष्टाचार काढला म्हणूनच माझ्यावर गुन्हा दाखल केला – आशिष शेलार
- शशिकांत शिंदे तुम्हाला थंड करुन घरात बसवायची आमच्यात ताकद – शिवेंद्रराजेंनी भरला दम
- शिवसेनेने छाटले रामदास कदमांचे पंख; दापोली विधानसभा क्षेत्रात माजी आमदार सूर्यकांत दळवी पुन्हा सक्रिय