मुंबई – राजस्थान, गुजरात, कर्नाटक, दिल्लीमध्ये रुग्ण ओमिक्रॉनचे सापडण्यास सुरुवात झाल्यानंतर मुंबईतही ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये राज्यातील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर आता धारावीचा परिसरही ओमिक्रॉनच्या छायेत आला आहे. टांझानिया येथून आलेला एक प्रवासी ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे सरकारसह प्रशासन दक्ष झाले आहे.
कोट्यवधींची संपत्ती असणारे प्रविण दरेकर मजूर कसे? संभाजी भोसलेंचा आक्षेप
टांझानियामधून हा प्रवासी 4 डिसेंबरला परतला होता. या प्रवाशाला 7 हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेसिंग चाचणीकरता कस्तुरबा गांधी रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवला होता. अखेर या चाचणीचा अहवाल मिळाला आहे. हा रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे. या रुग्णाला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती. त्याने कोरोना लशीचा एकही डोस घेतलेला नाही. त्याला विमानतळावर नेण्यासाठी आलेल्या दोन कुटुंबीयांचीही चाचणी करण्यात आली आहे, त्यांचे अहवाल लवकरच मिळणार आहेत.
“त्यांना जातीयवादाची काविळ झालीये”; अमोल कोल्हेंनी सुनावलं
ओमिक्रॉनचा राज्यातील पहिला रुग्ण कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सापडला होता. हा रुग्ण 33 वर्षांचा अभियंता होता. त्याचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याला घरी सोडण्यात आले असले तरी विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. हा रुग्ण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतून दुबई मार्गे आला होता. तो अभियंता असून तो एप्रिलपासून एका व्यापारी जहाजावर गेला होता. त्यामुळे त्याचे कोरोना लसीकरण झालेले नव्हते.
डोंबिवलीतील रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आता रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याला सात दिवस घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Read Also :
- पुण्यात रासपची स्वबळावर लढण्याची घोषणा; जानकरांची भाजपपासून फारकत?
- ‘हे सर्व भ्रष्ट शरद पवारांचे शागिर्द’; सोमय्यांच्या रडावर आता धनंजय मुंडे
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिकांनी न्यायालयात मागितली बिनशर्त माफी..
- राष्ट्रवादीत कलह आणि फायदा काँग्रेसचा; मिळाले उपसभापतिपद
- शिवसेना-राष्ट्रावादीत ठिणगी; शिवसेना सोयीचे वॉर्ड तयार करत असल्याचा दावा