जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभेचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जळगावमधील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांचा फोटो लावण्यात आला आहे. खडसेंचा फोटो हा सलग दुसऱ्या वर्षी लावण्यात आला आहे.
विधान परिषदेत कोणाची बाजी? अकोला नागपूरमध्ये शिवसेना भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
यामुळे अजूनही एकनाथ खडसेंचे वर्चस्व भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर आणि नेत्यांवर आहे हे सिद्ध झालं आहे. राजकीय वर्तुळामध्ये या बॅनरबाजीवरून चांगलीच चर्चा रंगलेली असल्याचे चित्र समोर आले आहे. संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे कार्यकर्त्यांनी बनवलेले शुभेच्छांचे बॅनर, फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. संजय सावकारे यांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर केवळ भाजप खासदार रक्षा खडसे यांचा फोटो आहे. दुसऱ्या बाजूला एकनाथ खडसेंचा फोटो आहे.
अनिल परबांकडून ‘त्या’ दहा हजार एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा..!
भाजपचे आमदार संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत. एकनाथ खडसे मागील काही काळामध्ये राष्ट्रवादी मध्ये गेल्याने सावकारे काहीसे एकाकी पडल्याचे पाहायला मिळत आहे . त्यातच आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कार्यकर्त्यांकडून देण्यात येणाऱ्या शुभेच्छांच्या बॅनरवर आता भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब झाल्याने खडसेंच्या पाठोपाठ सावकारे ही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
कल्याणमध्ये शिवसेनेला खिंडार?; माजी आमदार भाजपच्या वाटेवर?
भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी दिलेल्या शुभेच्छांच्या बॅनरवर भाजपच्या बड्या नेत्यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. भाजपचे जळगावातील बडे नेते गिरीश महाजन यांचा देखील फोटो बॅनरवर लावण्यात आला नव्हता. त्यावेळी देखील संजय सावकारे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत.
Read Also :
- ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले, मुंबईत कलम 144 लागू; रॅली आणि आंदोलन करण्यास मज्जाव
- पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसची ताकद अजिबातच नाही; अजित पवारांनी डिवचलं
- आमच्या घरी लवकरच सरकारी पाहुणे येणार आहेत; मलिकांच्या ट्विटने पुन्हा खळबळ
- ३०० ते ४०० गाड्यांचा फौजफाटा घेऊन एमआयएम धडकणार मुंबईमध्ये
- …तर भाजप आम्हाला फार दुर नाही; राष्ट्रवादीचा शिवसेनेला गर्भित इशारा