IMPIMP

एमआयएमच्या रॅलीला मुंबईमध्ये प्रवेश मिळणार नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील 

मुंबई : मुस्लिम आरक्षणावरून आता एमआयएम चांगलीच फ्रंटफूटवर आलेली दिसत आहे. मुल्सिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या मुद्द्यावरून आज एमआयएमने मोठी रॅली काढली आहे. एमआयएमकडून आज औरंगाबाद-मुंबई रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. सदरील रॅलीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. परवानगी नसतानांही एमआयएमने रॅली काढली आहे. कार्यकर्त्यांच्या ३०० गाड्यांचा ताफा घेऊन एमआयएमने थेट मुंबईत जाणार असल्याचे म्हटलं आहे.

कल्याणमध्ये शिवसेनेला खिंडार?; माजी आमदार भाजपच्या वाटेवर?

या रॅलीचे अध्यक्षपद खासदार इम्तियाज जलील हे आहेत आणि रॅली पूर्ण होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ओमिक्रोन व्हायरसच्या प्रवासामुळे राज्यात १४४ कलम लागू करण्यात आलेले आहे आणि मुंबईमध्ये देखील रॅलीला प्रवेश दिला जाणार नाही असं पोलीस अधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. असं असतानाही जलील यांनी रॅली काढली आहे. या रॅलीला सुरुवातील औरंगाबाद येथे अडवण्यात आलं होतं आणि नंतर अहमदनगरमध्ये देखील रॅलीला पुढे जाण्यास पोलीस प्रशासनाने मज्जाव केला आहे. यासंदर्भात आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

…तर भाजप आम्हाला फार दुर नाही; राष्ट्रवादीचा शिवसेनेला गर्भित इशारा

राज्यात सध्या ओमिक्रोनचा धोका असून त्यासाठी ठिकठिकाणी निर्बंध लावण्यात आलेले आहेत. कोणालाही अशी रॅली किंवा इतर सार्वजनिक  येणार नाहीत. ३०० गाड्यांमधील काही गाड्यांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. रॅली ज्या भागातून जाणार आहे त्याठिकाणचे अधिकारी या संदर्भात निर्णय घेतली आणि मी पुढे रॅली जाईल. मुंबईत कलाम १४४ लागू असल्याने गर्दी करता येणार नाही. एमआयएमच्या रॅलीला देखील मुंबईमध्ये प्रवेश मिळणार नाही हे मी आत्ताच स्पष्ट करत आहे असं देखील वळसे पाटलांनी म्हटलं आहे.

Read Also :

Total
0
Shares
Previous Article

भाजप आमदाराच्या वाढदिवसाच्या बॅनरवर खडसेंचा फोटो; जळगावच्या राजकारणात उडाली खळबळ

Next Article

शिवसेनेचा कारनामा: सरकारी कामात अडथळा, तीन माजी नगरसेवकांना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

Related Posts
Total
0
Share