जालना : जालन्यात शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांची ईडीने चौकशी केल्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच युवासैनिकांनी अर्जुन खोतकरांचा भावी खासदार म्हणून उल्लेख असलेले बॅनर लावून एकच धुरळा उडवून दिला आहे. त्यामुळे भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध अर्जुन खोतकर यांच्यात बॅनर वॉर चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले, मुंबईत कलम 144 लागू; रॅली आणि आंदोलन करण्यास मज्जाव
एकेकाळचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना-भाजपात ज्याप्रमाणे राज्यस्तरावर टोकाचा बेबनाव सुरू आहे तसाच किंबहुना त्यापेक्षा अधिकचा संघर्ष सध्या जालन्यात भाजपचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे, खाण व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात पाहायला मिळतोय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच खोतकर-दानवे यांच्यात वादाची ठिणगी पेटली होती.
भाजप आमदाराच्या वाढदिवसाच्या बॅनरवर खडसेंचा फोटो; जळगावच्या राजकारणात उडाली खळबळ
सेना-भाजप युती असून देखील खोतकरांनी बंड पुकारत दानवे विरोधात लोकसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली होती. ज्यामुळे फक्त स्थानिकच नव्हे तर राज्यस्तरावर देखील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. परंतु, थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत खोतकर-दानवे यांच्यात मनोमिलन घडवून खोतकरांचा बंड थंड केला होता. यांनतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत दानवेंचा विजय झाला तर विधानसभा निवडणुकीत खोतकरांचा पराभव झाला होता. खोतकर यांच्या पराभवामागे अप्रत्यक्षरीत्या दानवेंचाच हात असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात होते.
एमआयएमच्या रॅलीला मुंबईमध्ये प्रवेश मिळणार नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन रामनगर साखर कारखान्याच्या माध्यमातून खोतकरांनी 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, यानंतर काही दिवसातच अर्जुन खोटकरांवर ED चे छापे पडले होते. या कारवाईमागे देखील दानवे यांचाच हात असल्याचा आरोप खोतकर यांनी केला होता. यांनातर खोतकर-दानवे यांच्यात आरोप-प्रत्यारोपचा राजकीय कलगीतुरा सुरू झाला होता. दरम्यान, खोतकर-दानवे यांच्यातील वाद आता कुठेतरी शमत असताना जालन्यात एका युवासैनिकाने लावलेल्या बॅनरमुळे खोतकर-दानवे यांच्यातील वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Read Also :
- एमआयएमची रॅली उर्से टोल नाक्यावरून मुंबईकडे रवाना; जलील यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना टोलमाफी?
- पवारांनी २५ वर्षापुर्वी जे सांगितलं, आम्हाला ते दोन वर्षापुर्वी समजलं – संजय राऊत
- लवकरच भाजपच्या बड्या नेत्याला अटक होणार आहे; नवाब मलिकांचा रोख नेमका कुणाकडे?
- स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आमच्यावर एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे आरोप – गोपीचंद पडळकर
- शिवसेनेचा कारनामा: सरकारी कामात अडथळा, तीन माजी नगरसेवकांना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा