मुंबई – घोटाळ्यांच्या सर्व प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांचे नाव हे अत्यंत प्रखरतेने समोर येत आहे. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून ते विरोधी पक्षातील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत आहे. मागील काही दिवसांत त्यांनी परिवहनमंत्री अनिल परब , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर आरोप केले आहेत.
किरीट सोमय्यांनी घोटाळ्यांच्या बाबतीत वक्तव्य केल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या हे रविवारी डोंबिवलीत भाजप मेळाव्यात गेले होते . यावेळी सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि नेत्यांवर सडकून टीका केली आहे. मेळाव्यात भाजप आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर, नितीन पाटील, मंदार हळबे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
कोकणात मनसेची हवा, खेडमध्ये पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकही मनसेत
किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर आरोप करताना म्हटले आहे की कोरोना काळात भ्रष्टाचार करण्याच्या बाबतीत शिवसेनेने जागतिक रेकॉर्ड केले आहे. लवकरच आणखी एका नेत्याचा घोटाळा मी उघडकीस आणणार आहे.
सदरील मंत्र्याने त्याच्या परिचित व्यक्तींना आणि एका अधिकारी यांनी याच्या कंपनीला मुंबई महानगरपालिकेत कोरोना काळात कशा पद्धतीने १०० कोटींचे कंत्राट मिळाले हे येत्या मंगळवारी जनतेसमोर ठेवणार आहे. पुढच्या महिन्यापर्यंत आणखी पाच किस्से एमएमआर क्षेत्रातील महापालिकांमधील अधिकारी आणि सत्ताधारी नेत्यांमधील भागीदारी लोकांसमोर ठेवणार आहे.
“कसं काय शेलार बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?”; शिवसेनेचे आक्षेपार्ह पोस्टर
सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. त्यावरून देखील सोमैयांनी सरकारवर टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत किरीट एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत किरीट सोमय्यांना विचारणा केली असता, ‘हे सरकार कोमात जातंय याची काळजी आहे. वीज गायब होते आहे, एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. अनिल परब रोज म्हणतात एसटी सुटली, एसटी गावाला निघाली. पण एसटी कुठे आहे, असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
Read Also :
- “ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना फक्त शरद पवारच एकत्र आणू शकतात”
- पेपरफुटी प्रकरण: जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर अभाविपची निदर्शने, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची उचलबांगडी
- निवडणुका रद्द होणार की ओबीसींशिवाय?; आज महत्वाचा दिवस, सुप्रीम कोर्टात सुनावणी
- संजय राऊतांना धक्का: ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल, भाजपा महिला नेत्यानी दिली तक्रार
- महापौर करण्यासाठी एका एका नगरसेवकला ३५-३५ लाख रुपये दिले ; विनय कोरेंचा गौप्यस्फोट