मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या आरोपावरून शिवसेना आणि भाजपात सुरू झालेला वाद रोज वाढतो आहे.किशोरी पेडणेकर यांच्या तक्रारीवरून यासंदर्भात आशिष शेलार यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आशिष शेलार यांच्यावर विखारी टीका करणारे पोस्टर्स मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजपा प्रदेश कार्यालय समोर रात्री लावण्यात आले होते.
भाजप आमदाराच्या वाढदिवसाच्या बॅनरवर खडसेंचा फोटो; जळगावच्या राजकारणात उडाली खळबळ
या पोस्टरवर आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या वेषात दाखवले असून लिहिले आहे –
“कसं काय शेलार बरं हाय का ?
काल काय ऐकलं ते खरं हाय का ?
काल म्हणं तुम्ही, किशोरी ताईंचा अपमान केला,
तमाशातल्या नाच्या सारखा शिमगा केला?”
यानंतर हा वाद आणखी वाढण्याचे लक्षणं दिसत आहेत.
एमआयएमच्या रॅलीला मुंबईमध्ये प्रवेश मिळणार नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
आशिष शेलार यांच्यावर बोचरी टीका करणारे पोस्टर्स मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजपा प्रदेश कार्यालय समोर रात्री लावण्यात आले होते. यामध्ये आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या वेषात दाखवण्यात आलंय आणि त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.
वरळीच्या बीडीडी चाळीत सिलेंडरचा स्फोट झाल्याच्या दुर्घटनेत चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आणि पाठोपाठ त्याच्या वडिलांनाही प्राण गमवावे लागले. महापौर मात्र ७२ तास उलटल्यानंतर रुग्णालयात पोहोचल्या. नायर रुग्णालयात गेलेल्या जखमींवर सुमारे ४५ मिनिटे उपचार झाले नाहीत औषधोपचार झाला नाही किंवा त्यांची विचारपूसही करण्यात आली नाही.
याबाबत महापौर पेडणेकर यांच्यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले होते, ७२ तास तुम्ही का पोहचला नाही? करून दाखवलं म्हणता ना, मग कुठं निजवून दाखवलं होतं? झोपला कुठं होतात? यावरच्या आक्षेपाचे खंडन करताना शेलार म्हणालेत, झोपला कुठं होतात या अर्थाने मी हा शब्द वापरतो आहे. निजणं म्हणजे झोपणं. या अर्थाने झोपला कुठं होतात हा प्रश्न विचारला तर यात गैर काय?
Read Also :
- कोकणात मनसेची हवा, खेडमध्ये पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकही मनसेत
- “शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं”
- “मुंडेंसारखा नेता असता तर युती कायम राहिली असती”, राऊतांचे मोठे विधान
- “विरोधी पक्ष महाराष्ट्रात झोपलेला आहे. काम काय त्यांना?”
- शिवसेनेचा कारनामा: सरकारी कामात अडथळा, तीन माजी नगरसेवकांना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा