मुंबई – सध्याच्या घडीला भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता सापडत नाही. आज मुंडे असते, तर महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची युती अबाधित राहिली असती. शिवसेना काय चीज आहे याची कल्पना फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच होती, असे विधान रविवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. त्यामुळे पुन्हा एकदा एका नव्या राजकीय चर्चेने वेग धरला आहे. यावेळी राऊत यांनी शरद पवारांवरही कौतुकाचा वर्षाव केला. यशवंतरावानंतर पवार हे महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे नेतृत्व असल्याचे ते म्हणाले.
…तर भाजप आम्हाला फार दुर नाही; राष्ट्रवादीचा शिवसेनेला गर्भित इशारा
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांनी मुंडे आणि पवार दोघांचेही कौतुक केले. राऊत म्हणाले, सध्याच्या घडीला भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता सापडत नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय चीज आहे, याची माहिती फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच होती. गोपीनाथ मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती आजही दिसून आली असती. बहुजन समाजाच्या नेतृत्वाची सुरुवात त्यांनीच केली, असे विधान राऊत यांनी केले. राऊताच्या विधानामुळे पुन्हा एकदा नव्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
३०० ते ४०० गाड्यांचा फौजफाटा घेऊन एमआयएम धडकणार मुंबईमध्ये
संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव केला. राऊत म्हणाले की, शरद पवार सर्वात अनुभवी आणि लोकप्रिय नेते आहेत. कृषी, संरक्षण क्षेत्रात त्यांनी योग्य निर्णय घेतले. महाराष्ट्राने देशाला जी काही नेतृत्व दिली, त्यात यशवंतरावानंतर शरद पवार आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग शरद पवारांशिवाय होऊच शकत नव्हता. ८१ वर्षांनंतरही पवार एखाद्या तरुणासारखे राजकारणात सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले, हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत, असे राऊत म्हणाले.
Read Also :
- “विरोधी पक्ष महाराष्ट्रात झोपलेला आहे. काम काय त्यांना?”
- शिवसेनेचा कारनामा: सरकारी कामात अडथळा, तीन माजी नगरसेवकांना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
- एमआयएमच्या रॅलीला मुंबईमध्ये प्रवेश मिळणार नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
- भाजप आमदाराच्या वाढदिवसाच्या बॅनरवर खडसेंचा फोटो; जळगावच्या राजकारणात उडाली खळबळ
- ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले, मुंबईत कलम 144 लागू; रॅली आणि आंदोलन करण्यास मज्जाव