मुंबई – ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. गोपीनाथ मुंडे असते तर केंद्रावर दबाव आणून ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं असतं, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
लवकरच भाजपच्या बड्या नेत्याला अटक होणार आहे; नवाब मलिकांचा रोख नेमका कुणाकडे?
छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी करत आहोत. ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून भाजप कायदेशीर फंडे वापरत आहे. जनतेने हे लक्षात घ्यायला आहे. ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात कोण आहे ते जनतेने समजून घ्यावा. त्यामुळे भाजपला धडा शिकवला पाहिजे, असं भुजबळ यांनी सांगितलं.
पवारांनी २५ वर्षापुर्वी जे सांगितलं, आम्हाला ते दोन वर्षापुर्वी समजलं – संजय राऊत
इम्पिरिकल डेटा द्यावा अशी आमची मागणी आहे. भले तो सदोष का असेना पण केंद्राने हा डेटा दिला पाहिजे. आम्ही त्या चुका दुरुस्त करू. पण डेटा द्या. इम्पिरिकल डेटा देणं ही केंद्राची जबाबदारी होती. उज्ज्वला योजना देताना या डेटाचा केंद्र सरकारने वापर केला होता. मग आम्हालाच हा डेटा का दिला नाही? भाजप सरकारला ओबीसींना आरक्षणच द्यायचं नाही, असं सांगतानाच आज गोपीनाथ मुंडे असते तर भाजपकडून ओबीसी आरक्षणाला विरोध झाला नसता. त्याचं दु:ख आमच्या मनात आहे, असंही त्यांनी सांगितलं. उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ओबीसी आरक्षणाबद्दल येणार आहे याकडे आमचे लक्ष लागलेले आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Read Also :
- “राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित होणार आहे की नाही?”
- “कसं काय शेलार बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?”; शिवसेनेचे आक्षेपार्ह पोस्टर
- कोकणात मनसेची हवा, खेडमध्ये पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकही मनसेत
- “शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं”
- “मुंडेंसारखा नेता असता तर युती कायम राहिली असती”, राऊतांचे मोठे विधान