मुंबई – आरोग्य भरती परीक्षेत घोटाळा झाल्यानंतर आता म्हाडाची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यन्वित आहे की नाही? असा संताप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
शिवसेनेचा कारनामा: सरकारी कामात अडथळा, तीन माजी नगरसेवकांना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटवरून हा संताप व्यक्त केला आहे. राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आधी आरोग्य भरती परीक्षेचा घोळ झाला. पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत गेले आहेत. आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ आहे. सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही. भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस आहे. किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?, असा सवाल फडणवीस यांनी केला.
किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?
राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?
आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय !
नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका!दोषींवर कठोर कारवाई कराच!
पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही❓— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2021
आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका. दोषींवर कठोर कारवाई कराच. पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही, असा सवालही त्यांनी केला.
स्वत:चं अपयश झाकण्यासाठी आमच्यावर एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे आरोप – गोपीचंद पडळकर
आज राज्यभरात म्हाडाचा पेपर होणार होता. पेपर फुटल्याच संशय आल्यानंतर हा पेपर रद्द करण्यात आला. यामागचे कारणही तसेच आहे. ज्या जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुख व एजंट संतोष हरकळ, अंकुश हरकळ दोन एजंट हे रात्री विश्रांतवाडी परिसरामध्ये पेपर देण्यासाठी आले होते. तेव्हाच पुणे सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि अटक केली . हा पेपर रात्रीतून रद्द करण्यात आला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पेपर मोठ्या रकमेला विकला जाणार होता. हा पेपर होण्याआधीच पोलिसांच्या जाळ्यात मुख्य सूत्रधार अडकला याच्यामागे कोण मोठे सूत्रधार आहेत. याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
Read Also :
- “कसं काय शेलार बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?”; शिवसेनेचे आक्षेपार्ह पोस्टर
- कोकणात मनसेची हवा, खेडमध्ये पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकही मनसेत
- “शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं”
- “मुंडेंसारखा नेता असता तर युती कायम राहिली असती”, राऊतांचे मोठे विधान
- “विरोधी पक्ष महाराष्ट्रात झोपलेला आहे. काम काय त्यांना?”