नागपूर – महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकीच्या आज झालेल्या मतमोजणीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. रवींद्र उर्फ छोटु भोयर यांना त्यांचे स्वतःचे एक मत मिळाले आहे. काँग्रेस सारख्या सर्वात जुन्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला केवळ एक मत मिळणे, ही काँग्रेसची नाचक्की मानली जात आहे.
नागपूरमध्ये पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जबाबदार असल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. आज सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत ५४९ मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, रवींद्र भोयर यांना १, मंगेश देशमुख यांना १८६ मते प्राप्त झाली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना काळं फासण्याचा डाव? भाजप आमदारासोबतची ऑडिओ क्लीप व्हायरल
नाना पटोले यांनी मतदानाच्या आदल्या रात्री उमेदवार बदलवून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा घोषित केला. त्यामुळे काँग्रेससह महाविकस आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार सदस्य संभ्रमित झाले आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. हा पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कारण बानवकुळे यांना काँग्रेसची मतंही मिळाली आहेत.
“ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना फक्त शरद पवारच एकत्र आणू शकतात”
भोयर यांनी या पराभवानंतर भाजपने घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे. तसेच नाना पटोले यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली आहे. पण ऐनवेळी उमेदवार बदलावा लागण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवल्यानेच हा पराभव झाल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, अकोल्यातही महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झालं आहे. 400 हून अधिक मतं असलेल्या आघाडीच्या उमेदवाराला 334 एवढीच मतं मिळाली आहे.
Read Also :
- “त्यांच्या बापाशी लढून मी त्या पक्षामधून बाहेर पडलो. हे त्यांनी विसरू नये”
- भाजपच्या 12 आमदारांना सुप्रीम कोर्टाचा झटका, अधिवेशनालाही हजर राहता येणार नाही
- विलास लांडे पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर आमदार होणार.!
- मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- शिवसेना सचिव नार्वेकरांचा अवैधरित्या बांधलेला बंगला जमीनदोस्त; किरीट सोमय्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश