मुंबई : घोटाळ्यांच्या सर्व प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैयांचे नाव हे अत्यंत प्रखरतेने समोर येत आहे. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून ते विरोधी पक्षातील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत आहे. मागील काही दिवसांत त्यांनी परिवहनमंत्री अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर आरोप केले आहेत.
‘ह्यांच्या घरी पोर होईल का याचे उत्तर मी काय देणार?’, राज ठाकरेंचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला
किरीट सोमैयांनी केलेल्या पाठपुराव्याला आता खरोखर यश प्राप्त झाले आहे असं म्हणायला हरकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांचे स्वीय सहायक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या दापोलीतील अवैध बंगल्यावर ऑगस्ट महिन्यात कारवाई करण्यात आली होती आणि आता हा बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे.
Just show ShivSena CM Shri Uddhav Thackeray's Secratary Milind Narvekar's
"Demolished Unauthorised Bunglow" at Dapoli Sea Shore
दापोली समुद्र किनाऱ्यावरील शिवसेना मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा जमीनदोस्त झालेला बंगला पाहिला@BJP4Maharashtra pic.twitter.com/QTR63gdiOh
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 13, 2021
सोमैयांनी आता शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळत ट्विटरवर एक सेल्फी पोस्ट केला आहे. हा सेल्फी नोर्वेकरांच्या जमीनदोस्त झालेल्या बंगल्याचा आहे. फोटोमध्ये जुलै महिन्यात बंगल्याचा फोटो दिसत आहे तर त्याच ठिकाणी डिसेंबरमध्ये बंगला पाडल्यानंतरचा दुसरा एक फोटो सोमय्या यांनी पोस्ट केला.
‘फडणवीस आणि माझ्यात चर्चा झाली’; भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचे सूचक विधान
मिलिंद नार्वेकर यांनी बंगला बांधत असताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप किरिट सोमैयांनी यांनी केला होता. यासाठी वेगवेगळ्या पातळीवर सोमैयांनी तक्रार दाखल केली होती. कायद्याचं उल्लंघन करत झालेल्या या बांधकामावर कारवाईनंतर किरिट सोमय्या यांनी आपण स्वत: बंगला पाडल्यानंतर बघायला जाऊ असं देखील त्यांनी म्हटलं होतं. बंगला पडण्याची कारवाई पूर्ण झाल्यानंतर आता किरीट सोमैयांनी त्या स्थळाला भेट देत सेल्फी टाकला आहे.
Read Also :
- ९६ मतं फुटली आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विनोदवीर ठरले; आशिष शेलारांनी नाना पटोलेंची उडवली खिल्ली
- विजयाचा भावूक क्षण: देवेंद्र फडणवीसांना मिठी मारताच बावनकुळेंना अश्रू अनावर, फडणवीसही गहिवरले
- महापालिका पोटनिवडणुक: खासदार सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप यांच्यात होणार “कांटे की टक्कर”
- गोवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीबाबत अजून तरी कसलाही विचार नाही – संजय राऊत
- अकोल्यातही भाजपची मुसंडी: वसंत खंडेलवाल यांचा झेंडा फडकला, शिवसेनेचा दारुण पराभव