नागपूर : विधान परिषद निवडणुकांच्या दोन जांगांचे निकाल हाती आले. निकालांमध्ये भाजपनं महाविकास आघाडीला दुहेरी धक्का दिला आहे. नागपूर पाठोपाठ अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात भाजपनं विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपने आपली मते फक्त राखलीच नाहीत तर महाविकास आघाडीची 96 फोडली असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. हा महाविकास आघाडीला मोठा धक्का असल्याचे समजलं जात आहे.
रोहित पवारांचा राम शिंदेंना झटका! कर्जतमध्ये एक जागी राष्ट्रवादी बिनविरोध
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गळ्यात हार घालून अभिनंदन केलं. फडणवीसांनी आपल्या गळ्यात विजयाची माळ घातल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे भावूक झाले. त्यांनी फडणवीसांची गळाभेट घेतली. बराचवेळ त्यांनी फडणवीसांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. बावनकुळेंना अश्रू अनावर झाल्याचं पाहून फडणवीस यांनाही काही क्षण गहीवरून आलं होतं.
‘ह्यांच्या घरी पोर होईल का याचे उत्तर मी काय देणार?’, राज ठाकरेंचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला
चंद्रशेखर बावनकुळे हे विजयी झाल्याचं घोषित करण्यात आल्यानंतर भाजपने त्यांची विजयी मिरवणूक काढली. ही मिरवणूक सुरू होण्यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळेंची भेट घेतली आणि त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी फडणवीस यांनी आपल्या गळ्यातील विजयाचा हार फडणवीसांच्या गळ्यात घातला. फडणवीसांनी हा हार काढून तो बावनकुळे यांच्या गळ्यात घालून त्यांचं अभिनंदन केलं. फडणवीसांनी गळ्यात हार घालताच बावनकुळे यांना गहिवरून आलं. त्यांनी लगेचचं फडणवीसांना कडकडून मिठी मारली. बराच वेळ त्यांनी फडणवीसांना मिठी मारली होती. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. बावनकुळेंच्या डोळ्यातील अश्रू पाहून फडणवीसही अस्वस्थ झाले होते. हे चित्रं पाहून भाजपचे कार्यकर्तेही काही काळ स्तब्ध झाले होते. त्यानंतर फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला आणि बावनकुळे यांचं प्रचंड कौतुक केलं.
Read Also :
- महापालिका पोटनिवडणुक: खासदार सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप यांच्यात होणार “कांटे की टक्कर”
- गोवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीबाबत अजून तरी कसलाही विचार नाही – संजय राऊत
- अकोल्यातही भाजपची मुसंडी: वसंत खंडेलवाल यांचा झेंडा फडकला, शिवसेनेचा दारुण पराभव
- ‘फडणवीस आणि माझ्यात चर्चा झाली’; भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचे सूचक विधान
- ‘फडणवीस आणि माझ्यात चर्चा झाली’; भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचे सूचक विधान