नवी दिल्ली : गोवा विधानसभेची निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष देखील गोव्यात ताकदीने लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गोव्यातील एकमेव आमदार ममता बॅनर्जी यांनी फोडला आहे.
येथे छत्रपती शिवरायांचे चरण ठेवले होते; दिव्य काशी, भव्य काशीत मोदींकडून महाराजांचं स्मरण
त्यामुळे आता गोव्यातील राजकारण कमालीचं तापलेलं दिसत आहे. या संदर्भात महाराष्ट्रातील शिवसेना पक्षही गोव्यात ताकदीने लढणार आहे. यामुळे चुरस आता चांगलीच वाढलेली दिसत आहे. गोव्यातही महारष्ट्रासारखी आघाडी स्थापन करणार का ? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांना उपस्थित केल्यानंतर राऊतांनी माध्यमांना उत्तर दिलं आहे.
नागपूरमध्ये भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचा दणदणीत विजय; महाविकास आघाडीला जोरदार धक्का
गोव्याचं राजकारण हे महाराष्ट्रापेक्षा थोडं वेगळं आहे. गोव्यातही महाविकास आघाडी पॅटर्न राबवला जाईल याबाबत आत्ताच सांगणे उचित ठरणार नाही. त्यासाठी थोडा वेळ लागेल. सर्वांसोबत सध्या चर्चा सुरु आहे. समोरच्या पक्षाकडून सन्मानपूर्वक प्रस्ताव आल्यास नक्कीच त्याचा विचार आम्ही करू. राज्यात आम्हाला एकत्र यायचे आहे, तिथल्या लोकांसोबतच चर्चा केली जाते. आतापर्यंत ही चर्चा झालेली नाही असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
ममतांचा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादीचा ‘तो’ आमदार फोडला..
महाराष्टामध्ये ज्या पद्धतीने शिवसेना चांगलं काम करत आहे त्याचपद्धतीने गोव्यातही शिवसेना काम करते आहे. विकासाच्या मुद्यावर गोव्याची निवडणूक लढवली जाणार आहे. आमची पक्षबांधणी उत्तम आहे. तर कोलकात्यामधील तृणमूल गोव्यात निवडणूक लढवूशकतेतर महाराष्ट्र गोव्याच्या बाजूलाच आहे, असे संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
Read Also :
- अकोल्यातही भाजपची मुसंडी: वसंत खंडेलवाल यांचा झेंडा फडकला, शिवसेनेचा दारुण पराभव
- ‘फडणवीस आणि माझ्यात चर्चा झाली’; भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचे सूचक विधान
- ‘फडणवीस आणि माझ्यात चर्चा झाली’; भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचे सूचक विधान
- ‘ह्यांच्या घरी पोर होईल का याचे उत्तर मी काय देणार?’, राज ठाकरेंचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला
- रोहित पवारांचा राम शिंदेंना झटका! कर्जतमध्ये एक जागी राष्ट्रवादी बिनविरोध