अकोला : विधान परिषदेच्या अकोला – वाशिम – बुलढाणा या जागेचा निकाल हाती आला आहे. या जागेवर भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी शिवसेनेचे गोपिकिशन बजोरिया यांचा पराभव केला आहे.
नागपूरमध्ये भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचा दणदणीत विजय; महाविकास आघाडीला जोरदार धक्का
वसंत खंडेलवाल यांना 443 मते मिळाली आहेत तर गोपिकिशन बजोरिया यांना 334 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे वसंत खंडेलवाल यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास मते फुटली असल्याचं दिसत आहे. भाजप उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी ही निवडणूक 110 मतांनी जिंकली आहे. या निवडणुकीत 31 मते अवैध ठरली आहेत.
एकूण झालेलं मतदान-808
गोपीचंद बाजुरीया-334
वसंत खंडेलवाल-443
एकून मतदान -777
बाद-31
भाजपचे वसंत खडलेवाल यांचा 109 मतांनी विजयी झालेत…
जिल्हानिहाय मतदार
अकोला – 287
वाशीम – 168
बुलढाणा – 367
अकोला जिल्हा
जिल्हा परिषद – 60 मतदार, महानगरपालिका- 81 मतदार, अकोट नगरपरिषद- 36, तेल्हारा नगरपरिषद- 19, बाळापूर नगरपरिषद- 26, पातूर नगरपरिषद- 19, मूर्तिजापूर नगरपरिषद- 26, बार्शीटाकळी नगरपंचायत- 20.
वाशिम जिल्हा
जिल्हा परिषद- 58, नगरपरिषद वाशिम- 34, नगर परिषद कारंजा- 32, नगर परिषद मंगरुळ्पीर- 21, नगरपरिषद रिसोड- 23.
बुलढाणा जिल्हा
जिल्हा परिषद बुलढाणा- 71, नगरपरिषद बुलढाणा- 31, नगर परिषद चिखली- 30, नगर परिषद देऊळगाव राजा- 21, नगर परिषद सिंदखेड- 19, नगर परिषद लोणार- 20, नगर परिषद मेहकर- 27, नगर परिषद खामगाव- 37, नगर परिषद शेगाव- 32, नगर परिषद जळगाव जामोद- 21, नगर परिषद नांदुरा- 26, नगर परिषद मलकापूर- 32.
Read Also :
- ‘फडणवीस आणि माझ्यात चर्चा झाली’; भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचे सूचक विधान
- ‘फडणवीस आणि माझ्यात चर्चा झाली’; भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचे सूचक विधान
- ‘ह्यांच्या घरी पोर होईल का याचे उत्तर मी काय देणार?’, राज ठाकरेंचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला
- रोहित पवारांचा राम शिंदेंना झटका! कर्जतमध्ये एक जागी राष्ट्रवादी बिनविरोध
- ममतांचा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादीचा ‘तो’ आमदार फोडला..