अहमदनगर – कर्जत नगर पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री, भाजप नेते राम शिंदे यांच्यात जोरदार सामना रंगताना दिसत आहे. दरम्यान, कर्जत नगर पंचायत निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. अशावेळी रोहित पवार यांनी राम शिंदेंना पुन्हा एकदा जोरदार दणका दिला आहे. रोहित पवारांच्या खेळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलाय. तर तीन ठिकाणी उमेदवार बदलण्याची नामुष्की भाजपवर आली आहे.
भाजप आमदाराच्या वाढदिवसाला एकनाथ खडसेंची हजेरी, राजकीय चर्चेला उधाण..!
कर्जत नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. अशावेळी राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांच्या खेळीमुळे भाजप शहराध्यक्ष वैभव शहा यांची पत्नी राखी शहा यांच्यासह नीता कचरे, पूजा कचरे, नजमा बागवान, सुनंदा पिसाळ या भाजप उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. भाजपच्या उमेदवारांवर दबाव आणून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला जात असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. यावरुन शिंदे आणि निवडणूक अधिकारी यांच्या शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर शिंदे यांनी कर्जतचं ग्रामदैवत असलेल्या गोधड महाराजांच्या मंदिरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
एक लाख एसटी कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल? राज ठाकरेंचा रोखठोक सवाल
रोहित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. तर शिंदे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते सर्व ताकद लावून कामाला लागले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत विजय आमचाच होणार, नगर पंचायतीच्या 17 पैकी 17 जागा आम्हीच जिंकणार, असा दावा रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसंच राजकिय हित आणि राजकारण करणाऱ्या लोकांच्या मागे लोक कधीही उभे राहत नाहीत, असा टोलाही त्यांनी शिंदे यांना लगावला.
Read Also :
- ममतांचा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादीचा ‘तो’ आमदार फोडला..
- मनसेच्या होर्डिंगवर ‘जय श्रीराम’, औरंगाबादमध्ये जोरदार बॅनरबाजी!
- नाशिकमध्ये राज ठाकरेंचा शिवसेनेसह इतर पक्षांना मोठा दणका..
- लोकशाहीत अमृत पिऊन कुणीही सत्तेत बसत नाही हे फडणवीसांना कळायला हवं – नवाब मलिक
- येथे छत्रपती शिवरायांचे चरण ठेवले होते; दिव्य काशी, भव्य काशीत मोदींकडून महाराजांचं स्मरण