नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेने चांगलीच कंबर कसलीय. त्याचसाठी राज ठाकरे दौरे आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. सध्या मुंबई, पुणे आणि नाशिककडे मनसेने जास्त लक्ष केंद्रित केले आहे. आज राज ठाकरे नाशिकमध्ये आले असून, त्यांनी शिवसेनेसह भाजपला मोठा दणका दिला. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना काळं फासण्याचा डाव? भाजप आमदारासोबतची ऑडिओ क्लीप व्हायरल
आज सकाळी नाशिक मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांसह अनेकांनी मनसेत प्रवेश केला. यानंतर राज ठाकरे दिवसभर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत वन टू वन चर्चा करणार आहेत. महापालिका निवडणुकीबाबत त्यांची मते जाणून घेणार आहेत.
“ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना फक्त शरद पवारच एकत्र आणू शकतात”
दरम्यान आज 13 डिसेंबर रोजी राज ठाकरे नाशिकमध्ये आहेत. येथे अनेक कार्यकर्ते मनसेमध्ये प्रवेश करतील. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या जंगी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ते औरंगाबादकडे रवाना होतील. उद्या औरंगाबादमध्ये सकाळी 10 वाजता मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल.
Read Also :
- लोकशाहीत अमृत पिऊन कुणीही सत्तेत बसत नाही हे फडणवीसांना कळायला हवं – नवाब मलिक
- येथे छत्रपती शिवरायांचे चरण ठेवले होते; दिव्य काशी, भव्य काशीत मोदींकडून महाराजांचं स्मरण
- गृहमंत्री वळसे पाटलांच्या सचिवाच्या गाडीची काच फोडली; 50 हजारांसह महत्त्वाचे कागदपत्रे चोरीला
- सचिन सावंत धावले राऊतांच्या मदतीला; शब्दकोशातील ‘त्या’ शब्दाचा अर्थ दाखवला..
- भाजप आमदाराच्या वाढदिवसाला एकनाथ खडसेंची हजेरी, राजकीय चर्चेला उधाण..!