जळगाव – भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे आजही भाजपच्या काही नेत्यांबरोबर घरोबा असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे यांच्यासह राष्ट्रवादीमध्ये नव्याने प्रवेश केलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांची संख्या कमी होती . यामुळे राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चेला उधाण आले आहे.
…आणि पवार साहेबांबद्दल बोलताना अजितदादांचा कंठ दाटून आला..!
आमदार सावकारे यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त शहर व तालुक्यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान मंचावर आमदार सावकारे, रजनी सावकारे यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक प्रा. डॉ. सुनील नेवे, देवेंद्र वाणी, प्रमोद नेमाडे, माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भाजपचे युवराज लोणारी, मनोज बियाणी, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पिंटू राणे , भाजपचे शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे यांनी देखील हजेरी लावली होती. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या तुलनेत भाजपच्या नेत्याची संख्या कमीच होती. या कार्यक्रमात भाजपचा जिल्हास्तरावरील कोणताही नेता उपस्थित नव्हता.
राज्यात ज्याला आजपर्यंत दोन अंकी पाठबळ मिळालं नाही त्याला तुम्ही पंतप्रधान करणार – सताभाऊ खोत
या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी सावकारे यांचे तोंडभरून कौतुक केले. बहुतेक मोठ्या लोकांचे वाढदिवस डिसेंबर महिन्यात येतात. सावकारे यांनी देखील तेवढी उंची गाठावी, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली. आमदार सावकारे यांनी केक कापला. त्यांना खडसे यांनी आपल्या हाताने केक खाऊ घातला. हे सर्व चित्र पाहता सावकारे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
Read Also :
- अजित पवारांची ऑफर; राष्ट्रवादीला निवडून द्या 100 कोटी देतो…!
- किरीट सोमय्यांच्या रडारवर आता महाविकास आघाडीतील ‘हा’ नेता..
- “ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना फक्त शरद पवारच एकत्र आणू शकतात”
- पेपरफुटी प्रकरण: जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर अभाविपची निदर्शने, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची उचलबांगडी
- निवडणुका रद्द होणार की ओबीसींशिवाय?; आज महत्वाचा दिवस, सुप्रीम कोर्टात सुनावणी