मुंबई – राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी खुर्ची घेऊन जातानाचा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या फोटोची चांगलीच चर्चा झाली होती. मात्र त्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केले होते. या टीकेनंतर संजय राऊतांनी ‘ही चू**** बंद करा’ असे विधान करत भाजपला उत्तर दिले होते. याप्रकरणी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर दिल्लीच्या मंडावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापौर करण्यासाठी एका एका नगरसेवकला ३५-३५ लाख रुपये दिले ; विनय कोरेंचा गौप्यस्फोट
महाराष्ट्रतही राऊत यांच्या त्या शब्दांवरून भाजपने जोरदार टीका केली आहे. मुंबईत महिला कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार केली आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना भाजप नेते चू**** आहेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी दोनदा केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. मुंबई भाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर-देसाई यांनी ही तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून भारतीय दंडसंहितेच्या कलम ३५४ ए (१) व (४), ५०९, ५०४, ५०० नुसार सुयोग्य गुन्हा नोंदवावा, अशीही मागणी त्यात केली आहे.
संजय राऊतांना धक्का: ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल, भाजपा महिला नेत्यानी दिली तक्रार
दिल्लीत गुन्हा दाखल झाल्यानंतर राऊत यांच्या मदतीला काँग्रेसचे नेते सचिन सावंत धावून आले आहेत. त्यांनी ट्विट करून एक शब्दकोश दाखवला असून त्यात राऊतांनी वापरलेल्या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. ‘आश्चर्य आहे! संजय राऊत यांच्यावर भाजपा महिलांनी गुन्हा दाखल केला, का तर त्यांनी एक शब्द वापरला! जरी सदर शब्दाचा वापर मी करत नाही तरी अज्ञानी भाजपाच्या प्रबोधनासाठी मराठी लेखक व शब्दकोशकार कै. श्रीपाद जोशी यांच्या १९५७ पासून प्रकाशित अभिनव शब्दकोशातील तोच शब्द व अर्थ देत आहे, असे नमूद करत सावंत यांनी शब्दकोशच दाखवला आहे
आश्चर्य आहे! @rautsanjay61 यांच्यावर #भाजपा महिलांनी गुन्हा दाखल केला का तर त्यांनी एक शब्द वापरला! जरी सदर शब्दाचा वापर मी करत नाही तरी अज्ञानी भाजपाच्या प्रबोधनासाठी मराठी लेखक व शब्दकोशकार कै.श्रीपाद जोशी यांच्या १९५७ पासून प्रकाशित अभिनव शब्दकोशातील तोच शब्द व अर्थ देत आहे. pic.twitter.com/18s8Z7ZV06
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 12, 2021
Read Also :
- भाजप आमदाराच्या वाढदिवसाला एकनाथ खडसेंची हजेरी, राजकीय चर्चेला उधाण..!
- अजित पवारांची ऑफर; राष्ट्रवादीला निवडून द्या 100 कोटी देतो…!
- किरीट सोमय्यांच्या रडारवर आता महाविकास आघाडीतील ‘हा’ नेता..
- “ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना फक्त शरद पवारच एकत्र आणू शकतात”
- पेपरफुटी प्रकरण: जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर अभाविपची निदर्शने, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची उचलबांगडी