वर्धा : स्वतंत्र्य विदर्भाच्या मुद्द्यावरती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काळं फासण्याचा डाव एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उघडकीस आला आहे. समुद्रपूर तालुक्यातल्या एका प्रवीण महाजन या व्यक्तीने हिंगणघाटचे भाजप आमदार समीर कुणावार यांना फोन केला होता. त्यावेळी आमदार कुनावाल यांनी असं कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका, असा सल्ला कुणावार यांनी प्रवीण महाजन या व्यक्तीला दिला आहे.
…आणि पवार साहेबांबद्दल बोलताना अजितदादांचा कंठ दाटून आला..!
प्रवीण महाजन या व्यक्तीने हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांना फोन केला. त्यावेळी प्रवीण महाजन ही व्यक्ती म्हणाली की, आम्ही नितीन गडकरी यांच्याकडे आज संध्याकाळी निवेदन घेऊन येत आहोत. आमच्याकडून इतर काही अघटीत व्हावं. अशी गोष्ट करण्याचा विचार नाहीये. फक्त आम्ही शाई आमच्यासोबत घेऊन येऊ आणि हे निवेदन तुमच्या हस्ते त्यांच्याकडे देणार आहोत. विदर्भाच्या मागणीसाठी आम्ही त्यांना तोंडी सांगणार आहोत. मात्र, या सर्व गोष्टीनंतर हिंगणघाटे आमदार समीर कुणावार यांनी असं न करण्याचा सल्ला प्रवीण महानज यांना दिला आहे. तसेच निवडणुकीच्या तोंडावर असं करणही योग्य नाहीये. असं देखील कुणावार यांनी सांगितलं आहे.
राज्यात ज्याला आजपर्यंत दोन अंकी पाठबळ मिळालं नाही त्याला तुम्ही पंतप्रधान करणार – सताभाऊ खोत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल (रविवार) हिंगणघाट नगर परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हिंगणघाटमधील विविध विकासकामांचे लोकार्पण केले. तसेच यावेळी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, रामदास आंबटकर तसेच इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी यांनी आज हिंगणघाट नगर परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हिंगणघाटमधील विविध विकासकामांचे लोकार्पण केले. pic.twitter.com/3GBxoFoVCd
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) December 12, 2021
दरम्यान, स्वतंत्र्य वदर्भासाठी जनतेचा आक्रोश असल्यामुळे हा रोश केंद्र सरकार पर्यंत आम्हाला दर्शवायचा आहे. अशी प्रविण महाजन यांची इच्छा आहे. परंतु हिंगणघाटचे भाजपाचे आमदार कुणावार यांनी असं काहीही करू नका, असा सल्ला महाजन यांना दिला आहे. सध्या ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून डाव आखण्याचा प्रयत्न होतोय की काय? अशी चर्चा देखील होत असून प्रवीण महाजन यांच्यावर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Read Also :
- पेपरफुटी प्रकरण: जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर अभाविपची निदर्शने, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची उचलबांगडी
- निवडणुका रद्द होणार की ओबीसींशिवाय?; आज महत्वाचा दिवस, सुप्रीम कोर्टात सुनावणी
- संजय राऊतांना धक्का: ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल, भाजपा महिला नेत्यानी दिली तक्रार
- महापौर करण्यासाठी एका एका नगरसेवकला ३५-३५ लाख रुपये दिले ; विनय कोरेंचा गौप्यस्फोट
- पवार साहेबांचं नेतृत्व फक्त आणि फक्त साडेतीन जिल्ह्यात; निलेश राणेंनी उडवली खिल्ली