गोवा – पश्चिम बंगालमध्ये भाजपचा दारुण पराभव केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर पक्षविस्तारासाठी पावले पुढे टाकली आहे. येत्या काही महिन्यात गोव्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आज गोव्यात दाखल झाल्या आहेत. त्यांनी शरद पवारांना मोठा धक्का गोव्यातील राष्ट्रवादीचा एकमेव आमदाराला फोडून त्याला तृणमूलध्ये घेणार आहे.
अजित पवारांची ऑफर; राष्ट्रवादीला निवडून द्या 100 कोटी देतो…!
ममता बॅनर्जी या आक्रमकपणे गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत उतरल्या आहेत. तृणमूल काँग्रेस गोव्यात सर्व ४० जागा लढवणार आहे. ममता बॅनर्जी आज गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी ममता या मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर दोनच आठवड्यात त्यांनी पवार आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गोव्यातील एकमेव आमदार चर्चिल अलेमाव यांना गळाला लावले आहे.
शिवसेनेसोबत युती करायला तयार आहे, पण एमआयएमसोबत नाही – प्रकाश आंबेडकर
अलेमाव यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे तृणमूलमध्ये विलिनीकरण करावे, असे पत्र दिले. अलेमाव हे बेनोलिम मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचा ममतांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश होणार आहे. अलेमाव हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या तृणमूल प्रवेशाने गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे.
Read Also :
- मनसेच्या होर्डिंगवर ‘जय श्रीराम’, औरंगाबादमध्ये जोरदार बॅनरबाजी!
- नाशिकमध्ये राज ठाकरेंचा शिवसेनेसह इतर पक्षांना मोठा दणका..
- लोकशाहीत अमृत पिऊन कुणीही सत्तेत बसत नाही हे फडणवीसांना कळायला हवं – नवाब मलिक
- येथे छत्रपती शिवरायांचे चरण ठेवले होते; दिव्य काशी, भव्य काशीत मोदींकडून महाराजांचं स्मरण
- गृहमंत्री वळसे पाटलांच्या सचिवाच्या गाडीची काच फोडली; 50 हजारांसह महत्त्वाचे कागदपत्रे चोरीला