नागपूर : विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला असून या निवडणुकीत महाविकास आघाडीची तब्बल ४९ मतं फुटली आहेत. भाजपानं या निवडणुकीत यशस्वी खेळी खेळली असून त्याचा फटका महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना बसला आहे.
येथे छत्रपती शिवरायांचे चरण ठेवले होते; दिव्य काशी, भव्य काशीत मोदींकडून महाराजांचं स्मरण
भाजपाचे चंद्रशेखन बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली तर काँग्रेसनं ऐनवेळी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते पडली. तर काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांना १ मत तर ५ मते अवैध ठरली. चंद्रशेखर बावनकुळे यांचा १७६ मतांनी दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत एकूण ५५९ मते होती. त्यातील ५ जणांनी मतदान केले नाही. ५५४ जणांपैकी ३६२ मतं भाजपा उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पारड्यात पडली.
लोकशाहीत अमृत पिऊन कुणीही सत्तेत बसत नाही हे फडणवीसांना कळायला हवं – नवाब मलिक
विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाकडे केवळ ३२५ हक्काची मते होती. त्यातील एकही मत फुटू नये म्हणून भाजपानं मतदारांना पर्यटनासाठी पाठवलं होतं. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, छोटू भोयर १ आणि मंगशे देशमुख यांना १८६ मते मिळाली.
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा शिवसेनेसह इतर पक्षांना मोठा दणका..
मतमोजणीच्या पूर्वसंध्येला भाजपा व कॉंग्रेस दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा करण्यात आला. मतदारांची संख्या जास्त असल्याने सुरुवातीपासूनच भाजपाकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. बावनकुळे यांना चारशेहून अधिक मतं मिळतील, असा दावा करण्यात येत होता. तर कॉंग्रेसच्या नेत्यांनी २८० च्या जवळपास मत मिळतील, अशी भूमिका मांडली. ग्रामीण भागात भाजपाच्या ४२ मतांना फोडण्यात यश आल्याचे मंत्री सुनील केदार यांचे समर्थक सांगत होते. मात्र काँग्रेसने केलेला सर्व दावा आता फोल ठरल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत ९८.९३ टक्के मतदान झाले होते.
Read Also :
- ‘फडणवीस आणि माझ्यात चर्चा झाली’; भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचे सूचक विधान
- ‘ह्यांच्या घरी पोर होईल का याचे उत्तर मी काय देणार?’, राज ठाकरेंचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला
- रोहित पवारांचा राम शिंदेंना झटका! कर्जतमध्ये एक जागी राष्ट्रवादी बिनविरोध
- ममतांचा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादीचा ‘तो’ आमदार फोडला..
- मनसेच्या होर्डिंगवर ‘जय श्रीराम’, औरंगाबादमध्ये जोरदार बॅनरबाजी!