अहमदनगर : अहमदनगरमध्ये शिवद्रोही श्रीपाद छिंदम याने केलेल्या वक्तव्यनंतर त्याचे पद रद्द करण्यात आले होते. त्याजागेवर आता महानगरपालिकेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत राज्यातला महाविकास आघाडी पॅटर्न चालवला जाणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी सरळ लढत या ठिकाणी होणार आहे.
नागपूरमध्ये भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचा दणदणीत विजय; महाविकास आघाडीला जोरदार धक्का
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि नगरचे आमदार हे फ्रंटफूटवर राहून शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या रॅलीत दिसत आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार सुजय विखे यांनी देखील याजागेसाठी आपले लक्ष केंद्रित केले आहे. आमदार संग्राम जगताप विरुद्ध खासदार सुजय विखे यांच्यातील नेतृत्वाची ही लढाई आहे असं बोललं जात आहे. शिवसेनेचे सुरेश तिवारी यांच्या प्रचाराचा प्रारंभ आमदार जगताप यांच्यासह महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरापासून करण्यात आला आहे.
ममतांचा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादीचा ‘तो’ आमदार फोडला..
कोणत्याही परिस्थितीत आपल्यालाच विजय मिळवायचा आहे असा निश्चय महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. तथापि, कॉंग्रेसचे नेते या निवडणुकीपासून अलिप्त राहिले आहेत. प्रचाराच्या सुरुवातीला आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शहरप्रमुख संभाजी कदम, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, सभापती अविनाश घुले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, प्रा. माणिक विधाते, धनंजय जाधव, आरिफ शेख, संजय शेंडगे, पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
रोहित पवारांचा राम शिंदेंना झटका! कर्जतमध्ये एक जागी राष्ट्रवादी बिनविरोध
भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांच्या प्रचाराची सुरवात सर्जेपुरा चौकातून करण्यात आली. केंद्राने राबविलेल्या योजनांचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होईल, असे मत या वेळी भाजप नेत्यांनी व्यक्त केले. खासदार डॉ. विखे पाटील, भाजपचे नेते ॲड. अभय आगरकर, शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सुनील रामदासी, माजी उपमहापौर मालन ढोणे, वसंत राठोड, अॅड. विवेक नाईक, तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
Read Also :
- गोवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीबाबत अजून तरी कसलाही विचार नाही – संजय राऊत
- अकोल्यातही भाजपची मुसंडी: वसंत खंडेलवाल यांचा झेंडा फडकला, शिवसेनेचा दारुण पराभव
- ‘फडणवीस आणि माझ्यात चर्चा झाली’; भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचे सूचक विधान
- ‘फडणवीस आणि माझ्यात चर्चा झाली’; भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचे सूचक विधान
- ‘ह्यांच्या घरी पोर होईल का याचे उत्तर मी काय देणार?’, राज ठाकरेंचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला