मुंबई : मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. आता ६ च्या ६ जागांचे निकाल हाती आले आहे. कोल्हापूर, अकोला, नागपूर, मुंबई, धुळे, आमदार शरद रणपिसे यांच्या जागी रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.
रोहित पवारांचा राम शिंदेंना झटका! कर्जतमध्ये एक जागी राष्ट्रवादी बिनविरोध
यामध्ये कोल्हापूर, मुंबई, धुळे आणि आमदार प्रज्ञा सातव या जागा थेट बिनविरोध झाल्या होत्या. नागपूर आणि अकोल्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार होती. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी मोठ्या मताने विजयी होत महाविकास आघाडीला जोरदार धक्के दिले आहेत.
‘ह्यांच्या घरी पोर होईल का याचे उत्तर मी काय देणार?’, राज ठाकरेंचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला
विजयानंतर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजवून देणारे वक्तव्य केले आहे. नागपूर आणि अकोला मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ९६ मते फुटल्याचा दावा त्यांनी केला आहे. तिघांच्या विरोधात लढून भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे, असे ते म्हणाले.
‘फडणवीस आणि माझ्यात चर्चा झाली’; भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचे सूचक विधान
चुकून जर महाविकास आघाडीने मुंबई, धुळ्यात उमेदवारी मागे घेतली नसती तर, असंच यांचं नाक कापलं असतं असा टोला शेलार यांनी लगावला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे विनोदवीर आहेत असं शेलारांनी म्हटलं आहे. त्यांचं आता हास्यजत्रेपेक्षा मोठं हसू झालं आहे. तसेच या निवडणूक निकालानंतर आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले. विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात पुन्हा भाजपची नांदी होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
Read Also :
- विजयाचा भावूक क्षण: देवेंद्र फडणवीसांना मिठी मारताच बावनकुळेंना अश्रू अनावर, फडणवीसही गहिवरले
- महापालिका पोटनिवडणुक: खासदार सुजय विखे विरुद्ध आमदार संग्राम जगताप यांच्यात होणार “कांटे की टक्कर”
- गोवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीबाबत अजून तरी कसलाही विचार नाही – संजय राऊत
- अकोल्यातही भाजपची मुसंडी: वसंत खंडेलवाल यांचा झेंडा फडकला, शिवसेनेचा दारुण पराभव
- ‘फडणवीस आणि माझ्यात चर्चा झाली’; भाजप-मनसे युतीबाबत राज ठाकरेंचे सूचक विधान