पणजी : गोवा विधानसभेची निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष देखील गोव्यात ताकदीने लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गोव्यातील एकमेव आमदार ममता बॅनर्जी यांनी फोडला होता.
“हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदानाने घ्या”
आता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून गोव्यामध्ये कंबर कसली आहे. गोवा विधानसभा निवडणूक प्रचार समितीत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार राम सातपुते यांची निवड करण्यात आली आहे. गोवा राज्याची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरु आहे. सर्वपक्षीयांनी गोव्यात यंदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयार केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून वेगवेगळ्या मतदारसंघासाठी प्रचार समिती स्थापन करण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांवर अखेर बडतर्फीचा घाव; राज्य सरकार पाठवणार ‘ही’ नोटीस
या समितीत महाराष्ट्रातील आमदार राम सातपुते यांची निवड करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोवा निवडणुकीत प्रभारी आहेत. त्यांनी या निवडणुकीसंबंधी महाराष्ट्रातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांची फळी तयार केली असून त्यांची बैठक घेतली आहे. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मदत व्हावी आणि पक्षाची सत्ता पुन्हा यावी यासाठी विविध गोष्टींचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व गोष्टींचा भाग महाराष्ट्रातील भाजपाचे आमदार, पदाधिकारी यांच्यावर वेगवेगळ्या मतदारसंघाच्या संदर्भात निवडणूक प्रचार प्रक्रियेत सहभाग राहणार असल्याने ही निवड करण्यात आली आहे.
Read Also :
- राजकारण महाराष्ट्राचे : भाजपाच्या चित्रा वाघ यांना रोखण्यासाठीच रुपाली पाटलांचा प्रवेश
- तुम्ही कायम माझ्या हृदयात रहाल; रुपाली पाटील यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भावनिक पत्र
- बैलागाडा शर्यतीचा आज होणार ‘फैसला’; आमदार महेश लांडगेंनी दिल्लीत तळ ठोकला !
- मनसेला मोठे खिंडार, रुपाली पाटील यांचा राजीनामा; मनगटावर ‘घड्याळ’ बांधणार
- ओबीसी समाजाची 17 डिसेंबरला चक्काजाम आंदोलनाची हाक