मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. पाच दिवसांपूर्वीच सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित एका साखर कारखान्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
ठाकरे सरकारला मोठा धक्का: ओबीसी आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
धनंजय मुंडे यांनी मृत व्यक्तीचे अंगठे घेऊन कारखान्यासाठी जमीन बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर सोमय्यांनी केला होता. त्यानंतर आता सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, एफआयआरच्या पाठपुराव्यासाठी सोमय्या उद्या बीड जिल्ह्यातील जगमित्र शुगर आणि बर्दापूर पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत.
ठाकरे सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात मी ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे
एफआयआरच्या पाठपुराव्यासाठी मी उद्या बीड जिल्ह्यातील जगमित्र शुगर आणि बर्दापूर पोलीस स्टेशनला भेट देणार आहे. @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/bFACf5YFQb
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 15, 2021
सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात धनंजय मुंडे आणि जगमित्र शुगर मिल्स लि. विरुद्ध बर्दापूर पोलीस स्टेशन, बीड येथे नोंदवलेली एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेली SLP नाकारली होती. दरम्यान, या सर्व प्रकरणात 25 कोटींहून अधिकची फसवणूक झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्याशिवाय हजारो शेतकरी, भागधारक, सरकार, शेतकऱ्यांसह देवस्थानच्या जमिनी बळकावळ्याचाही आरोप सोमय्या यांनी मुंडे यांच्यावर केला आहे.
Read Also :
- ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने डेटा गोळा करावा – नाना पटोले
- आणखी दोन वर्षांत मी विरोधकांकडे काहीच शिल्लक ठेवणार नाही; आर. आर. आबांच्या मुलाने शड्डू ठोकला
- शिवरायांचा अवमान करणारी ही भाजपची छिंदम प्रवृत्ती; सचिन सावंत यांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात
- आता किराणा दुकानात वाईन मिळणार; ठाकरे सरकार लवकरच घोषणा करणार?
- उमेदवार शोधताना शिवसेना-काँग्रेसची दमछाक; देहू नगरीतील खरी लढाई राष्ट्रवादी-भाजपमध्येच!