मुंबई – गेल्या महिन्याभरात सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे याठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी निवडणूक घेण्यात आली आहे. आता मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी महिन्यात मुंबै बँकेची निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यानुसार मुंबै बँकेच्या निवडुकीत संदर्भात सेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत.
उमेदवार शोधताना शिवसेना-काँग्रेसची दमछाक; देहू नगरीतील खरी लढाई राष्ट्रवादी-भाजपमध्येच!
तिन्ही पक्षांनी आपल्याला बंडखोरांना सक्त ताकीद दिली आहे आणि जर कोणी दगाफटका केला तर त्याची गय केली जाणार नाही असा सज्जड दम देखील भरला आहे. शिवसेनेने मुंबै बँक निवडणुकीतील शिवसेना बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे.
दुसऱ्या बाजूला बंडखोर उमेदवार कमलाकर नाईक यांनी त्यांची उमेदवारी आज मागे नाही घेतली तर त्यांच्यावर पक्षांतर्गत मोठी करवाई करण्यात येणार आहे. कमलाकर नाईक यांनी बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
आता किराणा दुकानात वाईन मिळणार; ठाकरे सरकार लवकरच घोषणा करणार?
आता तिन्ही पक्ष हे एकत्र आले आहेत. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा मजूर गटातून आपला अर्ज भरला आहे. त्यांनी मजूर गटातून अर्ज भरल्यामुळे काहीसा वाद निर्माण झाला होता मात्र आता सगळ्या गोष्टी शांत करण्यात आलेल्या आहेत. आता सर्वांचेच लक्ष मुंबै बँकेच्या निकालाकडे लागले आहे.
Read also:
- “राष्ट्रवादीत आणखी आक्रमकरीत्या मी जनतेचे काम करणार”; पक्षप्रवेशानंतर रुपाली ठोंबरेंनी दिली प्रतिक्रिया
- बैलगाडा शर्यत लढा : विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा… आपल्या सर्जा-राजाचा…!
- रामदास कदम यांना मोठा धक्का; कदम समर्थकांना शिवसेनेने पदावरून हटवलं
- ठरलं! रुपाली पाटील हातावर घड्याळ बांधणार, अजितदादांच्या उपस्थितीत मुंबईत होणार पक्षप्रवेश
- चंद्रकांत पाटलांच्या वैधानिक अभ्यासाबद्दल न बोललेलंच बरं – भास्कर जाधव