मुंबई : कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबईत १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कलम १४४ बाबत, मुंबई पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून शहरात मोठ्या मेळाव्यावर बंदी लागू राहील. त्यामुळे मुंबईत ३१ डिसेंबर पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आली आहे.
मुंबै बँकेत सर्वपक्षीयांचं ठरलं! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार
देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे ७३ रुग्ण आढळले असून त्यापैकी ३२ प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे ओमायक्रॉन रुग्णांचा बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय राजस्थानमध्ये आतापर्यंत १७ प्रकरणे समोर आली आहेत. राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचे सहा, केरळमध्ये पाच, गुजरातमध्ये चार, कर्नाटक, तेलंगणामध्ये तीन आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. याशिवाय आंध्र प्रदेश, चंदीगड आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
आता किराणा दुकानात वाईन मिळणार; ठाकरे सरकार लवकरच घोषणा करणार?
मुंबई पोलीस उपायुक्त आणि बृहन्मुंबईचे कार्यकारी दंडाधिकारी चैतन्य एस यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, शहरात ३१ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू राहील. पोलीस आदेशात म्हटले आहे की, करोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराचा वाढता धोका लक्षात घेता हे निर्बंध आवश्यक आहेत.
चंद्रकांत पाटलांच्या वैधानिक अभ्यासाबद्दल न बोललेलंच बरं – भास्कर जाधव
आदेशानुसार, केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच दुकाने, आस्थापना आणि सर्व सार्वजनिक वाहतुकीत प्रवेश करण्याची परवानगी आहे. याशिवाय कोणताही कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच समाविष्ट करण्यास सांगितले आहे.
ठरलं! रुपाली पाटील हातावर घड्याळ बांधणार, अजितदादांच्या उपस्थितीत मुंबईत होणार पक्षप्रवेश
अधिसूचनेत म्हटले आहे की महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना लसीकरण करणे अनिवार्य झाले आहे. लसीकरण न केल्यास, त्यांना राज्यात प्रवेश करण्यापूर्वी RT-PCR चाचणी अहवाल नकारात्मक दाखवावा लागेल. हा अहवाल ७२ तासांपेक्षा पूर्वीचा नसावा. अधिसूचनेनुसार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य त्या कलमांतर्गत कारवाई केली जाईल.
Read also:
- शिवसेना खासदारानेच कोरोना नियमांचा उडविला फज्जा; ठाकरे सरकार हेमंत पाटलांवर कारवाई करणार का?
- मुंबै बँकेत सर्वपक्षीयांचं ठरलं! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार
- “राष्ट्रवादीत आणखी आक्रमकरीत्या मी जनतेचे काम करणार”; पक्षप्रवेशानंतर रुपाली ठोंबरेंनी दिली प्रतिक्रिया
- बैलगाडा शर्यत लढा : विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा… आपल्या सर्जा-राजाचा…!
- रामदास कदम यांना मोठा धक्का; कदम समर्थकांना शिवसेनेने पदावरून हटवलं