हिंगोली : महाराष्ट्रात कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनने एन्ट्री केली असल्याने राज्यात पुन्हा एकदा ठाकरे सरकारने कठोर नियमावली जाहीर केली आहे. मात्र या नियमावली मधून शिवसेनेचे नेते खासदार व आमदारांना ठाकरे सरकारने सूट दिली आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे, आणि त्याला कारण ठरलंय मागच्या काही दिवसात शिवसेनेच्या वतीने मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात घेण्यात येत असलेले शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. दहा दिवसांपूर्वी युवा सेनेचे नेते सिद्धेश कदम यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात, जिल्हाधिकाऱ्यांच्या कोरोना बाबत लागू केलेल्या नियमांना पायदळी तुडविण्यात आले होते.
आता किराणा दुकानात वाईन मिळणार; ठाकरे सरकार लवकरच घोषणा करणार?
आज देखील शिवसेनेचे नेते व हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या महावीर भवनमध्ये, ढोल ताशे फटाके व प्रचंड रोषणाईमध्ये कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या तोंडाला मास्क तर नव्हतेच पण सोशल डिस्टंसिंग चा पूर्णपणे फज्जा देखील उडविण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे खासदार महोदयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चक्क जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी देखील हजेरी लावली होती.
चंद्रकांत पाटलांच्या वैधानिक अभ्यासाबद्दल न बोललेलंच बरं – भास्कर जाधव
त्यामुळे विना मास्क शहरात फिरणाऱ्या नागरिकांकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करणाऱ्या हिंगोली जिल्हा प्रशासनाला सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांचा व लोकप्रतिनिधींचा प्रताप दिसत नाही का असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत, आणि दिसत असेल तर आता हिंगोली जिल्हा प्रशासन या नियम मोडणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून सरकारच्या नियमानुसार दंड वसूल करणार का हे पाहावे लागणार आहे.
Read also:
- मुंबै बँकेत सर्वपक्षीयांचं ठरलं! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार
- “राष्ट्रवादीत आणखी आक्रमकरीत्या मी जनतेचे काम करणार”; पक्षप्रवेशानंतर रुपाली ठोंबरेंनी दिली प्रतिक्रिया
- बैलगाडा शर्यत लढा : विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा… आपल्या सर्जा-राजाचा…!
- रामदास कदम यांना मोठा धक्का; कदम समर्थकांना शिवसेनेने पदावरून हटवलं
- ठरलं! रुपाली पाटील हातावर घड्याळ बांधणार, अजितदादांच्या उपस्थितीत मुंबईत होणार पक्षप्रवेश