मुंबई – मागील एकही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्याच्या विरोधात ठिकठिकाणी जाऊन रणशिंग फुकले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जर कुठे भ्रष्टाचार होत असेल तर ते थांबविण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
परिवहनमंत्री अनिल परब आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या विरोधात सोमैयांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. अनधिकृत बंगल्याच्या बांधकामापायी त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर कारवाई करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच जमीनदोस्त झालेल्या बंगल्याचे फोटो सोमैयांनी ट्विटरवर टाकले होते.
शिवरायांचा अवमान करणारी ही भाजपची छिंदम प्रवृत्ती; सचिन सावंत यांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात
आता त्याचे लक्ष परिवहनमंत्री अनिल परब आहेत. मात्र आता परबांनीच त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दापोली येथील रिसॉर्ट बांधकामासंदर्भात किरीट सोमय्या वारंवार जाणूनबुजून तक्रारी करत आहेत.
त्यांनी सगळा अभ्यास केलेला असूनदेखील त्यांनी या रिसॉर्टसंदर्भात ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या रिसॉर्टशी माझा कुठलाही संबंध नसल्याचे सरकारी यंत्रणेने स्पष्ट केले असूनही सोमय्या हे केवळ माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल असून त्यांना एकतर माझी माफी मागायला लागेल किंवा १०० कोटी द्यावे लागतील, असे रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी सांगितले.
पिंपरी- चिंचवडचा पाणीप्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन ठरले ‘फुसका बार’ जिव्हाळ्याचा प्रश्न असतानाही नागरिकांनी फिरवली पाठ
सोमैया जाणूनबुजून आपल्या कृतीतून दापोली आणि कोकण पर्यटनावर घावा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्वापार पद्धतीने व्यवसाय करत कित्येक व्यावसायिकांना त्यांनी नोटिसी पाठवल्याआहेत. त्यामधून जो रोजगार स्थानिकांना मिळत आहे त्याचा बट्ट्याबेाळ करण्याचा प्रयत्न किरीट सोमय्या यांच्याकडून केला जात आहे. मात्र आगामी काळात याला जनता उत्तर देईल असं देखील परब यांनी म्हटलं आहे.
Read also:
- ओमायक्रॉनचा धोका: मुंबईत ३१ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू, उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई
- शिवसेना खासदारानेच कोरोना नियमांचा उडविला फज्जा; ठाकरे सरकार हेमंत पाटलांवर कारवाई करणार का?
- मुंबै बँकेत सर्वपक्षीयांचं ठरलं! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार
- “राष्ट्रवादीत आणखी आक्रमकरीत्या मी जनतेचे काम करणार”; पक्षप्रवेशानंतर रुपाली ठोंबरेंनी दिली प्रतिक्रिया
- बैलगाडा शर्यत लढा : विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा… आपल्या सर्जा-राजाचा…!