पुणे : पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दबंग नेत्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश उपाध्यक्ष, माजी नगरसेवक डॉ. रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षस्रेष्टींकडे पाठवत मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या राजीनाम्याने पुणे शहरात मनसेला खिंडार पडले आहे.
पिंपरी- चिंचवडचा पाणीप्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन ठरले ‘फुसका बार’
काल दुपारी रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. ठोंबरेंनी प्रवेश केल्यानंतर लगेचच मनसेचे पुणे महानगपालिकेचे गटनेते वसंत मोरे यांनी त्यांचा, नगरसेवक साईनाथ बाबर आणि माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्रित असलेला फोटो ट्विटरवर टाकला. आम्ही दोन वाघ नेहमीच राज साहेबांसोबत असणार असंच काहीतरी त्यांना म्हणायचं होतं. दुसरीकडे रुपाली ठोंबरे यांना त्यांनी एक प्रकारे समोरून आव्हान देण्याचा हा प्रकार होता असं देखील बोललं जातं होतं. एकमेकांना भाऊ बहीण मानणाऱ्या ठोंबरे-मोरे संघर्षास आता सुरुवात झाली आहे.
बैलगाडा शर्यत लढा : विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा… आपल्या सर्जा-राजाचा…!
आता रुपाली ठोंबरे यांनी देखील वसंत मोरेंना उत्तर दिलं आहे. वसंत मोरे हे बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांनी मला हे सांगू नये की मी काय करायला हवं. मी भित्री आहे, पळपुटी आहे असं तर त्यांनी बोलूचं नये. जेव्हा माझ्यावर पक्षात अन्याय होत होता तेव्हा त्यांना पक्षाकडून विचारातही घेतलं जात नव्हतं त्यामुळे त्यांनी आता मला तोंड उघडायला लावू नये. वसंत मोरे असतील किंवा नगरसेवक साईनाथ बाबर असतील हे दोन्ही माझे भाऊ आहेत. भाऊ या नात्याने आता त्यांनी काहीही आरोप करू नये आणि मला काही बोलायला लावू नये अशीच माझी इच्छा आहे असं देखील ठोंबरेंनी म्हटलं आहे. अन्यथा त्यांना जसं बोलता येत तसं मला देखील बिनधास्त बोलता येतं हे त्यांनी विसरू नये.
Read also:
- “किरीट सोमय्या यांनी माझी माफी मागावी अथवा १०० कोटी भरावे”; परबांचा दम
- ओमायक्रॉनचा धोका: मुंबईत ३१ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू, उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई
- शिवसेना खासदारानेच कोरोना नियमांचा उडविला फज्जा; ठाकरे सरकार हेमंत पाटलांवर कारवाई करणार का?
- मुंबै बँकेत सर्वपक्षीयांचं ठरलं! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार
- “राष्ट्रवादीत आणखी आक्रमकरीत्या मी जनतेचे काम करणार”; पक्षप्रवेशानंतर रुपाली ठोंबरेंनी दिली प्रतिक्रिया