पुणे : महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून विविध सरकारी भरत्यांसाठी लेखी पेपर घेण्यात आले आहेत. यामध्ये म्हाडा आणि आज होणार असणाऱ्या टीईटी परीक्षेचा समावेश होता. दोन्ही परीक्षांना पेपर फुटीचा फटका बसला आहे.
मुंबै बँकेत सर्वपक्षीयांचं ठरलं! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार
पेपरफुटी प्रकरणातमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. टीईटी परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकाराच्या संदर्भात पुणे पोलिसांच्या सायबर सेलने तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले होते. याचौकशीनंतर तुकाराम सुपेंना पोलिसांनी अटक केली. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप तुकाराम सुपेंवर करण्यात आला आहे. याच प्रकरणात म्हाडा पेपरफुटीतील आरोपीचा देखील समावेश आहे.
शिवसेना खासदारानेच कोरोना नियमांचा उडविला फज्जा; ठाकरे सरकार हेमंत पाटलांवर कारवाई करणार का?
पोलिसांनी म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार डॉ. प्रितीश देशमुख याच्या घराची झाडाझडती घेतली केली होती. यामध्ये प्रितेशकडे टीईटीच्या चाळीस आपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे आणि टीईटीचे ५० ओळखपत्र देखील सापडले आहेत. राज्यात २१ नोव्हेंबर रोजी टीईटीची परीक्षा घेण्यात आली होती. टीईटीला परीक्षांसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. परिक्षेपासूनच विद्यार्थ्यांनी प्रश्नसूची आणि उत्तरसूचीमध्ये तफावत असल्याचा आरोप करत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोपांनंतरही टीईटी परीक्षेची उत्तरसूची जाहीर करण्यात आली नाही. त्यातच आता अशी घडामोड झाल्याने विद्यार्थी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- एसटी आंदोलनाचा अनिल परबांनी घेतला धसका; परबांच्या सुरक्षा व्यवस्थेत झाली मोठी वाढ
- नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का; माजी आमदार संजय पवारांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- जर मी बिनधास्तपणे बोलायला लागले तर अवघड होईल; रुपाली पाटील यांचे वसंत मोरेंना थेट उत्तर
- “किरीट सोमय्या यांनी माझी माफी मागावी अथवा १०० कोटी भरावे”; परबांचा दम
- ओमायक्रॉनचा धोका: मुंबईत ३१ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू, उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई