मुंबई : एसटी संपातील कार्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई करण्याबाबत आज झालेल्या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, या प्रकणावरील कोर्टाचा निर्णय 20 तारखेला येणार आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मला सुरक्षित असल्याची जाणीव होतेयं; रुपाली पाटलांच्या भावना
एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्या अंतर्गत कारवाई प्रत्यक्ष सुरु करण्याचा इशारा गेल्या आठवड्यात परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. तरीही राज्यातील एसटीच्या विविध आगारांमधे कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. आत्तापर्यंत 10 हजारपेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर दोन हजार पेक्षा जास्त जणांची सेवा ही समाप्त करण्यात आल्याचे एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आम्ही आहोत म्हणून महाविकास आघाडीची सत्ता आहे; अशोक चव्हाण यांच वक्तव्य
अनिल परब म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना भरकटवल जात असून, आमचा प्राथमिक अहवाल 20 तारखेला दाखल करणार आहोत. आज झालेल्या बैठकीत आम्ही आढावा घेतला असून यामध्ये अधिकारी आणि कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व प्रकणावरील कोर्टाचा निकाल 20 डिसेंबर रोजी येणार आहे. त्यामुळे त्यानंतर कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेणार आहोत. कामगारांनी कुणाचं ऐकायचं आणि कुणाचे नाही ठरवलं पाहिजे. काही लोक कामगारांची माथी भडकवत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनो, आता सहनशीलता संपत आलीयं, आमचा अंत पाहू नका; अजित पवारांचा इशारा
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरपासून आंदोलन सुरु आहे, तर दिवाळीपासून एसटी कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष संप सुरु केला आहे. राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीची घोषणा केल्यावरही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच राहिले आहे.
Read also:
- भाजपला सुरुंग: भुसावळमधील तब्बल २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, वीज वापराल तर बिल भरावंच लागेल – नितीन राऊत
- केंद्र सरकारने ओबीसींची जनगणनाच केली नाही; छगन भुजबळांचा धक्कादायक दावा
- राज्य सरकारचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने फेटाळला; ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार
- एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यासाठी आयोगाला विचार करावाच लागेल – बाळासाहेब थोरात