मुंबई : दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ घडून आली. हिंदुत्ववादी शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांबरोबर सलोखा करणे पसंद केले आणि भारतीय जनता पक्षाशी असणारी युती तोडून टाकली. महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकारचे तीन पक्षांचे सरकार उदयास आले.
कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, वीज वापराल तर बिल भरावंच लागेल – नितीन राऊत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. किमान समान वाटप कार्यक्रमांतर्गत तीन पक्षांनी गेल्या दोन वर्षांपासून सरकार चालवले आहे. मात्र, या तिन्ही पक्षांत सर्वकाही आलबेल नसल्याचं अनेकदा समोर आलं आहे. त्यातच आता निधी वाटपातही मोठी असमानता झाली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात कमी निधी वाट्याला मिळालेला आहे. राज्यात दोन नंबरचे सर्वात जास्त आमदार असतानाही शिवसेनेच्या पदरात कमी निधी पडला आहे. राज्याच्या आर्थिक बजेटमधून सदरील माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निधी वाटपाच्या बाबतीत क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.
भाजपला सुरुंग: भुसावळमधील तब्बल २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
त्यानंतर काँग्रेस आणि सर्वात शेवटी म्हणजे शिवसेना. इतकेच नाही तर याच पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांचेच सुपुत्र हे मंत्री असताना सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण विभागालाही निधीबाबतीत फटका बसला आहे. शिवसेनेचे राज्यात ५६ आमदार त्यांना ५२,२५५ कोटी इतका निधी मिळाला आहे. काँग्रेस पक्षाचे काँग्रेस ४३ आमदार असताना काँग्रेसला निधी १,००,०२४ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ५३ आमदार असताना २,२४,४११ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. भाजपशी युती तोडूनही शिवसेनेच्या वाटेला कमीच निधी आला असल्याचे बोलले जात आहे.
Read also:
- मी त्या गुजरातमधून आलोयं, जिथं ५० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात; हार्दिक पटेलांची टीका
- राज्यात सत्ता असतानाही एका नगरपंचायतीच्या जागेसाठी संघर्ष करणे, यातच राष्ट्रवादीचा पराभव – चंद्रकांत पाटील
- अशोक चव्हाण बरोबर बोलतायं, काँग्रेसमुळेच महाविकास आघाडीची सत्ता; बाळासाहेब थोरातांचा इशारा
- अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते; भाजप नेते निलेश राणेंचा खळबळजनक दावा
- 20 डिसेंबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई होणार नाही – अनिल परब