मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या नगरसेविका राखीताई जाधव यांनी आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने घाटकोपर येथे ‘राष्ट्रवादी चषक’ ही भव्य क्रिकेट स्पर्धा भरवली होती. त्यात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली उपस्थीती लावली.
अशोक चव्हाण बरोबर बोलतायं, काँग्रेसमुळेच महाविकास आघाडीची सत्ता; बाळासाहेब थोरातांचा इशारा
जयंत पाटलांना क्रिकेट खेळण्याचा मोह देखी आवरला नाही. राजकारणाच्या मैदानावर तुफान फटकेबाजी करणाऱ्या जयंत पाटलांनी क्रिकेटच्या मैदानावरही जोरदार फटकेबाजी केली.
स्पर्धेला उपस्थीत राहिल्यानंतर जयंत पाटलांनी भाषण देखील केलं म्हणाले ”या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी याठिकाणी उपस्थित राहिलो. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचा उत्साह पाहून मला क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि मग मीही मैदानात उतरलो. खेळत असताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. क्रिकेटसह इतरही खेळांच्या स्पर्धेचे आयोजन याठिकाणी करण्यात आले होते. या उपक्रमामुळे स्थानिक खेळाडूंच्या कलागुणांना नक्कीच वाव मिळेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. आयोजकांनी यापुढेही असे नवे उपक्रम नागरिकांसाठी घेऊन यावेत”.
Read also:
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अचानक रात्री विधानभवनात मारली धडक; विधानभवनाची केली पाहणी
- बेळगावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान; मराठी भाषिकांचा संघर्ष पेटणार, आज बंदची हाक
- महापालिका करसंकलन विभागात “गोलमाल है, सब गोलमाल है..!” दोन कर्मचारी सापडले एसीबीच्या जाळ्यात..!
- उद्धवा अजब तुझे सरकार; स्वतःच्या पक्षालाच दिलाय निधी वाटपात सर्वात कमी निधी
- मी त्या गुजरातमधून आलोयं, जिथं ५० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात; हार्दिक पटेलांची टीका