मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत कलहाला अखेर वाचा फुटली आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी परिवहन नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज पत्रकार परिषदेत बोलताना रामदास कदम यांनी म्हटलं की, अनिल परब यांनी मनसे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांना हाताशी धरुन आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला आहेत. स्थानिक आमदारांना डावलून सातत्याने आमच्या मुळावर उठण्याचे काम अनिल परब यांनी केले आहे. गद्दार कोण हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळले पाहिजे. अनिल परबांना मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पक्षासोबत गद्दारी करत आहेत, असा आरोप रामदास कदमांनी केला आहे.
महापालिका करसंकलन विभागात “गोलमाल है, सब गोलमाल है..!” दोन कर्मचारी सापडले एसीबीच्या जाळ्यात..!
यावर अनिल परब यांनी मात्र बोलणं टाळलं आहे. अनिल परब यांना यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, मी याबाबतीत काही बोलू इच्छित नाही. माझ्यावर काहीही आरोप केले तरी मी काही बोलणार नाही. मी एक शिवसैनिक आहे. ते शिवसेना नेते आहेत. याबाबत जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल, असं परब यांनी म्हटलं आहे.
बेळगावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान; मराठी भाषिकांचा संघर्ष पेटणार, आज बंदची हाक
रामदास कदम म्हणाले की, संजय कदम यांना मी मोठं केलं. पण त्याने पक्ष सोडल्यानंतर भगवा झेंडा पायाखाली तुडवून जाळला. त्यांना आता हाताशी धरलं जात आहे. आमचे निष्ठावंत उदय सामंत यांना बोलावलं. आता आम्हाला त्यांच्याकडून निष्ठा शिकावी लागत आहे. अनिल परब शिवसेनेला गहाण ठेवत आहेत. मग गद्दार कोण आहे, असा सवाल त्यांनी केला. एसटी कर्मचारी संप सुरु आहे आणि आत्महत्या होत आहेत. पण अनिल परब यांना वेळ नाही. अनिल परब यांची भाषा अशी आहे की ते राष्ट्रवादी नेता म्हणून बोलत आहेत. शिवसेना म्हणजे काय हे आता आम्हाला उदय सामंत सांगत आहेत. 52 वर्ष आम्ही या पक्षासाठी खर्च केले आहे, असं ते म्हणाले.
Read also:
- शिवसेना पक्षप्रमुख कोण? उद्धव ठाकरे की अनिल परब? रामदास कदमांचा हल्लाबोल
- जो प्रयत्न अमरावतीत झाला तो पुन्हा झाला तर सोडायचं नाही; राज ठाकरेंचे आदेश
- शिवसेना नेत्याची तडकाफडकी परिषद; उद्धव साहेब आम्हाला ही निष्ठेची ही भेट दिली का? रामदास कदमांना अश्रू अनावर
- आमच्या टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतो; क्रिकेटच्या मैदानावर जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अचानक रात्री विधानभवनात मारली धडक; विधानभवनाची केली पाहणी