श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने अभिनेता संजय दत्तला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आला होता. आता त्याला दुसऱ्याच आजाराचे निदान झाले असून, त्याला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे.
काही दिवसांपुर्वी संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतर त्याला दोन दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळाला होता. मात्र, आता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती आहे. उपचारासाठी तो अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे.
— Sanjay Dutt (@duttsanjay) August 11, 2020
संजय दत्तची पत्नी मान्यता आणि दोन्ही मुलं सध्या दुबईत आहेत. संजय दत्तच्या एका जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे. त्यावर उपचार होऊन तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, उपचारासाठी संजयला तातडीने अमेरिकेला जावं लागेल. संजय दत्तने काही दिवस वैद्यकीय उपचारासाठी कामातून ब्रेक घेत असल्याचे म्हटले होते.