मुंबई : पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
केदार हे मंगळवारी नागपुरात होते. त्यांनी जिल्ह्यातील विविध भागात पाऊस व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर ते मुंबईला रवाना झाले. गुरुवारी सकाळी त्यांना ताप चढला व काहिसे अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्यातील अनेक नेत्यांनी कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान केदार यांना दुपारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात गेले व कोरोनाची अॅन्टीजन चाचणी केली. अहवाल पॉझिटिव्ह येताच ते तेथेच उपचारासाठी भरती झाले. त्यानंतर सायंकाळी आरटीपीसीआर चाचणीसाठी नमूने घेण्यात आले. त्याचा अहवाल शुक्रवारी येईल. दरम्यान, केदार यांच्या नागपूर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही खबरदारी म्हणून चाचणी करून घेतली आहे.