नवी दिल्ली : गेल्यावर्षी केंद्र सरकारने कलम 370 हटवत जम्मू काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले होते. लेह हा लडाखचा भाग आहे. मात्र लेहला जम्मू-काश्मीरचा भाग दाखवल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर वादात अडकले आहे. या प्रकरणात आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला नोटीस बजावली आहे.
Ministry of Electronics & IT issued notice to Twitter on Nov 9 for showing Leh as part of J&K instead of Union Territory of Ladakh
Notice directed Twitter to explain in 5 days as to why legal action shouldn't be taken against them for disrespecting India's territorial integrity
— ANI (@ANI) November 12, 2020
चुकीचा नकाशा दाखवून भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा अनादर केल्याबद्दल कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये?, असे मंत्रालयाने म्हटले आहे. 5 दिवसात या नोटीसला उत्तर देण्यास सरकारने ट्विटरला सांगितले आहे.
याआधी देखील ट्विटरने जम्मू-काश्मीर हा चीनचा भाग असल्याचं दाखवलं होतं. त्यानंतर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर ती चूक दुरुस्त करण्यात आली होती. लेह हा लडाख सोबतच केंद्र शासित प्रदेश असल्याची चूक ट्विटरने अद्याप दुरुस्त केली नाही. त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे.