IMPIMP

“शरद पवार अजितदादांना नाही तर सुप्रिया सुळेंनाच मुख्यमंत्री करतील”

मुंबई  – “शरद पवार साहेबांना राज्याचं नेतृत्व करण्याची वेळ आली तर ते अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळेंनाच करतील”, असे विश्लेषण करत चंद्रकांत पाटील यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवार साहेबांना राज्याचं नेतृत्व करण्याची वेळ आली तर ते अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळेंनाच करतील, असं माझं विश्लेषण आहे. ही माझी माहिती आहे. शरद पवारांचं तसं करणं चुकीचंही नाही. त्यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करावं वाटणं हे चूक नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांचं कौतुक केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना काय काय बोलणी खावी लागलीत याची माहिती आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र हे चुकीचं नाही, त्यांच्या मुलीबद्दल प्रेम असणं स्वाभाविक आहे, हे माझं विश्लेषण आहे, यावर मी ठाम आहे, असंही ते म्हणाले.

सर्वसामान्य माणूस म्हणून सांगायचं झालं तर शरद पवारांना संधी आली तर सोडून गेलेल्या अजित दादांना उपमुख्यमंत्री करायचं असतं. तिथं जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांना करायचं नसतं. वेळ आली तर पिंपरीत पार्थ पवार, जिल्हा बदलून जायचं असेल तर रोहित पवारांना संधी मिळते, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Read Also :

‘आज सरकार पाडू, उद्या पाडू म्हणणार्यांचेच दात पडलेत’ मुख्यमंत्र्यांची भाजपवर खोचक टीका

शेतकऱ्यांच्या ‘चलो दिल्ली’ मार्चनं दिल्लीच्या सीमांना छावणीचं स्वरुप