कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळेल असा दावा भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जात असतो. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वजण झोपेत असतानाच हे सरकार पडणार आहे, असा दावा केला होता. यावरून आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.
महाराष्ट्र झोपेत असतानाच राज्य सरकार रात्रीत कोसळेल, असे म्हणणारे चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावाले कोमात आहेत की काय?, असा खोचक सवाल हसन मुश्रीफ यांनी करत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
गेली अठरा महिने आमचे सरकार सुस्थितीत चालले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात करोना आढावा बैठकीसाठी असता ते बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलेली “सेव्ह मेरीट- सेव्ह नेशन” ही संघटना भाजपा आणि आरएसएसशी संबंधित आहे. या संघटनेचे पदाधिकारी भाजपा आणि आरएसएसचेही पदाधिकारी आहेत, असा आरोप त्यांनी केला.
Read Also :
- पालखी सोहळ्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन निर्णय घेणार – अजित पवार
- ‘मुख्यमंत्र्यांनी कॅबिनचा चेहरा पाहिला नाही, कॅबिनेने कधी मुख्यमंत्र्यांचा चेहरा पाहिला नाही’
- संभाजीराजेंचा आंदोलनाचा इशारा; अजित पवार म्हणाले, अजून 9 दिवस बाकी आहेत
- ‘संभाजी छत्रपतींना कुणीही राजीनामा मागितलेला नाही’
- ‘राहुल गांधींची सत्तेवाचून तडफड सुरू आहे’