शिवसेना आणि भाजप युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये अनेक टीकाकरण झाले. अजूनही होत आहेत. परंतु शिवसेना आणि भाजपमध्ये कितीही मतभेद असले, तरी कोरोनाच्या संकटकाळात राजकीय चेहऱ्यापलीकडे प्रत्येक नेत्यांमध्ये माणुसकी ही असतेच या माणुसकीचे दर्शन आज मुख्यमंत्र्यांनी घडवले.
कोरोनाची लागण झालेले पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला. मोहोळ यांच्या प्रकृतीची उद्धव ठाकरे यांनी विचारपूस केली. काळजी घेऊन लवकर बरं होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. फील्डवर काम करत असल्याबद्दल त्यांचं कौतुकही केलं. भाजपचे नगरसेवक असलेले मोहोळ थेट मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे हरखून गेले.
दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. 4 जुलै रोजी सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापौरांनी वेगवेगळ्या बैठकांना हजेरी लावली होती. यामुळे त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे बोललं जात आहे