IMPIMP

‘पुरुष पोलिसाची हिम्मतच कशी झाली?’, प्रियांका गांधींच्या ‘त्या’ फोटोवर चित्रा वाघ संतापल्या  

मुंबई  : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये झालेल्या  घटनेने देशभरात  संतापाची लाट उसळली  पीडित कुटुंबीयांची  भेट घेण्यासाठी  निघालेल्या  काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी  यांना  युपी  पोलिसांच्या  मोजोरीला  सामोरे जावे लागले. यावेळी प्रियांका गांधींची कॉलर पकडल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावर  भाजप  नेत्या चित्रा वाघ यांनी संतप्त  प्रतिक्रिया दिली आहे.  
 
‘महिला नेत्याच्या कपड्यांवर हात टाकण्याची पुरुष पोलिसाची हिम्मतच कशी झाली. युपी पोलिसांना त्यांच्या मर्यादा समजायला हव्या. भारतीय संस्कृतीवर विश्वास ठेवणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशा पोलिसांवर कारवाई करावी’ अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी ट्विट करत  दिली आहे .  

दरम्यान   हाथरसच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वढेरा यांना1 ऑक्टोबर रोजी यमुना द्रुतगती महामार्गावर अटक करण्यात  आली होती त्यापूर्वी राहुल गांधी यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. तर यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींची देखील यू.पी. पोलिसांनी कॉलर पकडली होती. यांनतर आखेर  काळ राहुल आणि प्रियांका यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.  

Read Also :