IMPIMP

राज्यात  1 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक आणणार , मुख्यमंत्र्यांचा निर्धार 

 
मुंबई  :  महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीत देशाचे महत्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचे लक्ष्य असून आतापर्यंत 35 हजार कोटींचे करार झाले आहेत. यातून 23 हजार 182 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.  
 

सोमवारी  झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. कोरोनासारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे. यासाठी उद्योग खात्याचा अभिमान आहे. मागील सामंजस्य करारातील 60 टक्के उद्योगांच्या बाबतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 15 कंपन्यांमार्फत जवळपास 34 हजार 850 कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. या गुंतवणुकीमुळे 23 हजार 182 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगन आदी उपस्थित होते.

 या कंपन्यांशी  करार 

  • मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि., जपान; 490 कोटी, रोजगार 350
  • एव्हरमिंट लॉजिस्टिक्स, हिंदुस्थान 354 कोटी, 2,100कोटी
  • नेट मॅजिक आयटी सर्विसेस प्रा. लि., हिंदुस्थान 10,555 कोटी, रोजगार 575
  • मंत्र डेटा सेंटर, स्पेन 1,125 कोटी, 80 रोजगार
  • एसटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स इंडिया प्रा. लि. 825 कोटी, 800 रोजगार
  • प्रिन्स्टन डिजिटल ग्रुप, सिंगापुर, 1,500 कोटी, 300 रोजगार

Read Also :