मुंबई : गेल्या काही दिवसांपासून करोनाशी झुंज देत असलेले काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचे निधन झाले आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील २० दिवसांपासून उपचार सुरू होते. सुरूवातील त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली. मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवल्याचं वृत्त काँग्रेसकडून देण्यात आले. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
“काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!” अशा शब्दात शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्याआहेत.
गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 16, 2021
“खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला. आपल्या सर्वांसाठीच हा मोठा धक्का आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो”. अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.
खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला. आपल्या सर्वांसाठीच हा मोठा धक्का आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 16, 2021
“खरं तर आजचा दिवस हा माझ्यासाठी आणि तमाम काँग्रेसच्या कार्यकर्तासाठी आजचा दिवस हा काळा दिवस ठरला आहे. राजीव सातव यांच्याविषयी काय बोलावं, काय लिहाव काहीच सुचत नाही. आमच्यासाठी राजीव सातव गेल्याने ही पोकळी कधिच भरून न निघणारी आहे.” नाना पटोले यांनी “अलविदा मेरे दोस्त” या शब्दात सातव यांना श्रद्धांजली वाहिली.
निशब्द..
आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस.
माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही.
.
भावपूर्ण श्रद्धांजलीकाय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे.
अलविदा मेरे दोस्त ! pic.twitter.com/mYU8b0ASJn
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 16, 2021
“खा. राजीव सातव यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. युवक काँग्रेसपासून आम्ही एकत्र व जवळ होतो. राजीवजींच्या यशाचा मी साक्षीदार होतो. माझा लहान भाऊ, मित्र,सहकारी व काँग्रेसचे उमदे नेतृत्व कोरोनाने हिरावून नेले. श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल वाटले नव्हते. भावपूर्ण श्रद्धांजली”, सचिन सावंत यांनी अशा शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
खा. राजीव सातव यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. युवक काँग्रेसपासून आम्ही एकत्र व जवळ होतो. राजीवजींच्या यशाचा मी साक्षीदार होतो. माझा लहान भाऊ, मित्र,सहकारी व काँग्रेसचे उमदे नेतृत्व कोरोनाने हिरावून नेले. श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल वाटले नव्हते. भावपूर्ण श्रद्धांजली pic.twitter.com/SOzhOmZZQ2
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 16, 2021
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करत सातव यांना अतिशय भावुक श्रद्धांजली वाहिली आहे. “मी निशब्द झालो आहे. आज एक असा सहकारी गमवला आहे ज्याने सर्वाजनिक जीवनात पहिलं पाऊल युवक काँग्रेसच्या माध्यमातून माझ्यासोबतच टाकलं होतं. आम्ही आजपर्यंत सोबतच होतो. राजीव सातव यांचा सधेपणा, हसतमुख चेहरा, जमिनीशी जुळलेले, नेतृत्व आणि पक्षाशी निष्ठा असलेले आणि त्यांची मैत्री कायम आठवणीत राहील.”
निशब्द !
आज एक ऐसा साथी खो दिया जिसने सार्वजनिक जीवन का पहला कदम युवा कांग्रेस में मेरे साथ रखा और आज तक साथ चले पर आज…
राजीव सातव की सादगी, बेबाक़ मुस्कराहट, ज़मीनी जुड़ाव, नेत्रत्व और पार्टी से निष्ठा और दोस्ती सदा याद आयेंगी।
अलविदा मेरे दोस्त !
जहाँ रहो, चमकते रहो !!! pic.twitter.com/5N94NggcHu
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 16, 2021
“काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो! ॐ शान्ति”, – (विधानसभा विरोधी पक्षनेते) देवेंद्र फडणवीस
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे.
तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो!
ॐ शान्ति— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 16, 2021
“माझा मित्र राजीव सातव गेल्याने मला फार दुःख झाले आहे. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती. काँग्रेस पक्षाच्या आदर्शांना मूर्त रूप देणारा तो नेता होता. हे आपल्या सर्वांसाठी एक मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवदेना व्यक्त करतो,” असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.
I’m very sad at the loss of my friend Rajeev Satav. He was a leader with huge potential who embodied the ideals of the Congress.
It’s a big loss for us all. My condolences and love to his family. pic.twitter.com/mineA81UYJ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2021
“काँग्रेसचे युवा नेते,खासदार राजीव सातव यांच्या निधनानं महाराष्ट्रानं,देशानं एक अभ्यासू,कार्यकुशल,आश्वासक नेतृत्व गमावले आहे.त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी,कार्यकर्त्यांशी जवळिकीचे,मित्रत्वाचे,सोहार्दाचे संबंध होते.ते भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते.भावपूर्ण श्रद्धांजली!” – (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र) अजित पवार
काँग्रेसचे युवा नेते,खासदार राजीव सातव यांच्या निधनानं महाराष्ट्रानं,देशानं एक अभ्यासू,कार्यकुशल,आश्वासक नेतृत्व गमावले आहे.त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी,कार्यकर्त्यांशी जवळिकीचे,मित्रत्वाचे,सोहार्दाचे संबंध होते.ते भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते.भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/1KKrvxDCtE
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 16, 2021
“कॉंग्रेसमधील युवा नेतृत्व, राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद असून, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो! राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” (विधान परिषद विरोधी पक्षनेते) प्रवीण दरेकर
कॉंग्रेसमधील युवा नेतृत्व, राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद असून, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो!💐
राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/Ak6oXIyWYD— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 16, 2021
“राजीव सातव तु हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे.. चार दिवसापूर्वीच विडिओ काॅलवर आपण निशब्द हाय हॅलो केले..लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे.. तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू?”, अशी तळमळ शिवसेनेचे खासदार संजय राऊत व्यक्त केली आहे.
राजीव सातव तु हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे..
चार दिवसापूर्वीच विडिओ काॅलवर आपण निशब्द हाय हॅलो केले..लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे..
तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू? pic.twitter.com/dR0txA7JkS— Sanjay Raut (@rautsanjay61) May 16, 2021