मुंबई: विधानसभेच्या रिक्त असणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या गटनेत्यांची बैढक बुधवारी रात्री उशीरा कोणत्याही निर्णयाविना संपली. आज गुरुवारी पुन्हा सर्व नेते भेटणार आहेत. अध्यक्ष निवड करायची असेल तर त्यासंबंधीतील पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गुरुवारी संध्याकाळपयर्यंत द्यावे लागणार आहे. तरच राज्यपालांकडून निवडणुकीचा कार्यक्रम येऊ शकतो. काल झालेल्या बैठकीतमध्ये अध्यक्ष पदावरुन संभ्रम कायम राहला आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थीत एक बैठक झाली. या बैठकतीत अध्यक्षपदाची निवडणुक घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी तयार असली तरी शिवसेनेकडून ही निवडणूक कशा पद्धतीने पार पडले याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
आमदाराच्या आरटीपीसीआर तपासणी ४८ तास आधी करायला सांगितली आहे. राज्यापालांना तर उद्याच पत्र द्यावे लागले. त्यानंतर जर आमदार बांधित निघाले आणि आमदाराना येता आले नाही तर अडचण होईल असा मुद्दा शिवसेनेकडून उपस्थीत करण्यात आला असल्याचे सुत्राने सांगितले आहे.
अध्यक्षपदासाठी मतदान झाले तर
शिवसेनेला पांठिबा देणारे सदस्य क्रांतिकारी शेतकरी पक्ष १, अपक्ष ६ राष्ट्रवादी काँग्रेसला पांठिबा देणारे सदस्य समाजवादी पार्टी २, बहुजन विकास आघाडी ३, शेकाप १, स्वाभिमानी१ अपक्ष १ तसेच काँग्रेसचे संख्याबळ ४३ असेल तरी त्यांच्या एक आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे नुकतचे निधन झाले आहे. हे सर्व मिळून एकून संख्या बळ १७० आहे. तसेच शिवसेनेच्या आमदाराची प्रकृतीवरुन सेनेत निवडणुकीबाबत धाकधूक असल्याचे बोले जात आहे.
तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निवेदनाचा आधार घेत विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याबाबतची योग्य कार्यवाही करा असे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. ६ जुलै रोजी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या जोरदार हालचाली सुरू असून ही निवडणूक आमच्या सरकारने विश्वासमत सिद्ध केले त्यापेक्षाही जास्त मतांनी जिंकू असा दावा महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला.
विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत नितीन राऊतही
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस श्रेष्ठी संग्राम अनंतराव थोपटे यांच्यासह राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नावाचाही विचार करीत आहेत. सूत्रांनी सांगितले की, पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांनी श्रेष्ठींना राज्यात दलित मतदारांना पक्षाकडे वळवण्याची जी सूचना केली होती त्यानुसार नितीन राऊत यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत समाविष्ट झाले. दलित मतदारांना आपलेसे करण्यावरही मंथन सुरू आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रातून ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांना राज्य मंत्री बनवले जावे.