नवी दिल्ली : देशात गेल्या दोन महिन्यांपासून चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश अश्या पाच ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांचा माहोल होता. या पार्श्वभूमीवर जवळजवळ ६६ दिवस मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलची दरवाढ केंद्र सरकारकडून करण्यात आली नव्हती.
मात्र, निवडणुकांचे निकाल लागताच उन्हाच्या झळा बसतात, तसे महागाईचे चटकेदेखील बसायला सुरुवात झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली असून, सलग दोन दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होऊ लागली आहे.
चुनाव ख़त्म,
लूट फिर शुरू!#PetrolDieselPriceHike— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 6, 2021
दरम्यान, यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं असून, “निवडणूक संपल्या संपल्या पुन्हा लूट सुरु…” असं ट्वीट त्यांनी केलं आहे. तसेच त्यांनी PetrolDieselPriceHike असा हॅशटॅग देखील सोबत वापरला आहे.
Price of petrol & diesel in #Delhi at Rs 90.99 per litre and Rs 81.42 per litre respectively today
Petrol & diesel prices per litre – Rs 97.34 & Rs 88.49 in #Mumbai, Rs 92.90 & Rs 86.35 in #Chennai and Rs 91.14 & Rs 84.26 in #Kolkata
(file photo) pic.twitter.com/oNbZLUATAl
— ANI (@ANI) May 6, 2021
देशात महिनाभरापूर्वी कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी डॉलरच्या तुलनेत विनिमय दर ७२.५९ रुपये होता. तो आता ७४.१८ रुपये झाला आहे, तर ४ मे रोजी पेट्रोलच्या किंमतीत १५ पैसे आणि डिझेलच्या किंमतीत १८ पैशांची वाढ झाली. यानंतर ५ मे रोजी पेट्रोलच्या किंमतीत १९ पैसे आणि डिझेलच्या किंमतीत २१ पैशांची वाढ झाली.